Goa News | Pharmacy
Goa News | Pharmacy Dainik Gomantak

Goa News: फार्मसी कौन्सिल निवडणूक नऊ वर्षे न घेतल्याने संताप!

Goa News: गोव्यात नऊ वर्षे फार्मसी कौन्सिलची निवडणूक न घेता जुनेच मंडळ चालू ठेवणे बेकायदेशीर आहे.

Goa News: वैधानिक गोवा फार्मसी कौन्सिलची निवडणूक गेली नऊ वर्षे ताटकळत असून, राज्यातील औषधालयांचे मालक उद्विग्न बनले आहेत. यासंदर्भात कौन्सिलच्या सदस्यांनी अखिल भारतीय फार्मसी कौन्सिलकडे तक्रारही नोंदविली आहे. गोव्यात कोविडनंतर अचानक फोफावलेल्या फार्मसी व्यवसायात अनिष्ठ प्रथांनी शिरकाव केल्याने या व्यवसायात प्रतिमा राखून असलेले औषधालयांचे मालक चक्रावले आहेत.

‘गोव्यात नऊ वर्षे फार्मसी कौन्सिलची निवडणूक न घेता जुनेच मंडळ चालू ठेवणे बेकायदेशीर आहे. यासंदर्भातील दोन तक्रारी मी अखिल भारतीय कौन्सिलकडे केल्या आहेत,’ अशी माहिती गोव्यातील फार्मसी संघटनांचे एक सदस्य रत्नदीप कुडतरकर यांनी आज दै. ‘गोमन्तक’ला दिली.

Goa News | Pharmacy
Goa Police Station: दक्षिण गोव्यात महिलांची सुरक्षा रामभरोसे; अनेक पोलीस स्टेशनमध्ये महिला कर्मचारीच नाही

सूत्रांच्या मते, गोव्यातील फार्मसी कौन्सिलच्या निवडणुकीत मताधिकार असलेले 2 हजार 500 सदस्य असून, त्या सगळ्यांना मतपत्रिका पाठवून ती प्रत्यक्ष भरून घेण्याची प्रक्रिया वेळकाढू असते. परंतु ही प्रक्रिया कधीतरी सुरु झालीच पाहिजे. आता कौन्सिलच्या निबंधकपदी राजश्री गुढे यांची नव्याने नेमणूक झाल्यानंतर ही निवडणूक लवकर होईल, अशी आशा फार्मसी कौन्सिलच्या अनेक औषधालय सदस्यांनी या प्रतिनिधीकडे व्यक्त केली.

फार्मसी कौन्सिलच्या निवडणुका ठराविक कालमर्यादित घेण्याची घटनेमध्ये तरतूद असतानाही नऊ वर्षे यासंदर्भात चालढकल करण्यात आली. दहा वर्षांपूर्वी मंडळाच्या निवडणुका होऊन पाच सदस्य बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर सरकारने आपले पाच सदस्य नियुक्त केल्यानंतर दोन पदसिद्ध सदस्यांसह पाच वर्षांच्या कालावधीसाठी 2013 साली हे मंडळ कार्यरत झाले होते.

Goa News | Pharmacy
Goa Municipality: पणजी महापालिकेने आठवड्यात जमविला '38' लाखांचा महसूल

पहिल्या कार्यकारिणी बैठकीत नियुक्त सदस्यांमधून प्रकाश शंखवाळकर यांना अध्यक्ष म्हणून निवडण्यात आले होते. या मंडळाचा कार्यकाल चार वर्षांपूर्वीच संपला असून, सरकारने निवडणूक घेण्यासाठी पदसिद्ध सदस्य, अन्न व औषध संचालनालयाच्या प्रमुख ज्योती सरदेसाई यांची नेमणूक केली आहे.

गोव्यातील एकमेव सरकारी फार्मसी कॉलेजचे प्राचार्य आगामी निवडणूक लढवून अध्यक्ष बनण्यास उत्सुक असल्याची माहिती काही सदस्यांनी या प्रतिनिधीला दिली.

फार्मसी कॉलेजमधूनच बाहेर पडणारे पदवीधर राज्यात औषधालये सुरू करतात व ते मंडळाचे सदस्यही असल्याने त्यांचा पाठिंबा मिळवून या महत्त्वाच्या समितीवर स्वतःची वर्णी लावण्याचा प्रयत्न त्यांनी चालवला आहे. परंतु स्वायत्त मंडळावर सरकारी कर्मचारी किंवा सरकार नियुक्त सदस्य असू नये, यासाठी बरेचसे फार्मासिस्ट आग्रही आहेत.

Goa News | Pharmacy
Goa Tourism: पर्यटकांसाठी मोफत बससेवा लवकरच सुरु होणार- रोहन खंवटे

न्‍यायालयात जाणार

  • ठराविक मुदतीत निवडणुका न घेतल्यामुळे फार्मसी मंडळाला अधिकृत पत्र पाठविले असून, काही सदस्यांनी केंद्रीय मंडळाकडेही तक्रारी नोंदविल्या आहेत.

  • यासंदर्भात न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचाही निर्णय काही सदस्यांनी घेतला असल्याची माहिती मिळते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या, शुक्रवारी कालमर्यादा संपलेल्या मंडळांची बैठक होत आहे.

  • नवीन निवडणूक घेण्याच्या मागणीसंदर्भात चर्चा होईल अशी अपेक्षा आहे. वाढत्या दबावामुळे येत्या डिसेंबरमध्येच निवडणुकीची घोषणा होऊ शकते, अशी माहिती प्राप्त झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com