Illegal Hill Cutting : मळा-पणजी येथे बेकायदा डोंगर कापणी रोखली

केंद्र सरकारच्या जागेत आगळीक : नगरसेविकेने आणला प्रकार उघडकीस
Illegal Hill Cutting
Illegal Hill Cutting Dainik Gomantak
Published on
Updated on

Illegal Hill Cutting मळा-पणजी येथे सुरू असलेली कथित बेकायदेशीर डोंगरकापणी स्थानिकांनी नगरसेविकेच्या मदतीने बुधवारी सकाळी भरारी पथकाला पाचारण करून रोखली. मळा येथील नगरसेविका अदिती चोपडेकर यांनी सांगितले की, केंद्र सरकारच्या जागेमध्ये ही डोंगर कापणी एका स्थानिकाकडून होत असून ती बेकायदेशीर आहे.

चतुर्थीच्या दिवसांत सर्वजण आपापल्या व्यापात गुंतलेले असल्याचे पाहून बुधवारी मळा येथे एका व्यक्तीने गुपचूप डोंगर कापणी केल्याचे स्थानिकांनी नगरनियोजन विभागाच्या भरारी पथकाच्या निदर्शनास आणून दिले.

बुधवारी, सकाळी स्थानिकांनी सुरू असलेल्या या डोंगरकापणीला विरोध केला आणि लगेच भरारी पथकाला घटनास्थळी बोलावून काम बंद करायला भाग पाडले.

तेथील एका स्थानिकाने प्रसार माध्यमांना सांगितले की, डोंगर कापणी होत असलेली ही जागा केंद्र सरकारची आहे. बुधवारी या डोंगराळ भागात एका व्यक्तीकडून डोंगर कापणी करून रस्ता बनवण्याचे काम सुरू असल्याचे दिसून आले.

चोपडेकर पुढे म्हणाल्या की, या व्यक्तीकडे डोंगर कापणीसाठी परवानगी किंवा कसली कागदपत्रे असावीत, असे वाटत नाही. येथे काही दलालांकडून धमकावण्याचे आणि स्थानिकांना दादागिरी करण्याचे प्रकार घडत असल्याचे त्यांनी सांगितले.

सूचना फलक असूनही...

पणजीच्या नगरसेविका अदिती चोपडेकर यांनी सांगितले की, एक व्यक्तीची या डोंगराळ भागात जागा आहे. ती व्यक्ती डोंगर कापून आपल्या जागेकडे येण्यासाठी मार्ग बनवत आहे.

जिथे डोंगर कापणी सुरू आहे, ती जागा केंद्र सरकारची असून तिथे तसा सूचना फलकही असल्याचे चोपडेकर यांनी नमूद केले.

Illegal Hill Cutting
Goa Green Cess Case: राज्य सरकारला मिळणार शेकडो कोटींचा महसूल, उच्च न्यायालयाचा 'त्या’ कंपन्यांना दणका

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com