Banastarim Bridge Accident: मेघनाच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी

फोंडा अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी होणार
Court
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Banastarim Bridge Accident: बाणस्तारी अपघात प्रकरणावेळी मर्सिडीज कारमध्ये असलेल्या व कारच्या मालकीण मेघना सावर्डेकर हिने अटकपूर्व जामिनासाठी केलेल्या अर्जावर आज 23 रोजी फोंडा अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे.

न्यायालयाने अर्जावरील सुनावणी तहकूब करताना तिला अंतरिम अटकपूर्व जामीन दिला होता. पोलिसांनी तिला नोटीस बजावून चौकशीसाठी बोलावल्यानंतर तिने न्यायालयात धाव घेतली होती.

या अपघातावेळी मर्सिडीज कार चालवत असलेल्या संशयित श्रीपाद ऊर्फ परेश सावर्डेकर याला अटक केली होती. मात्र, प्रत्यक्षदर्शी घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका वाहनचालकाने चालकाच्या आसनावर मेघना सावर्डेकर होती व तीच कार चालवत असल्याचे उघड केले होते.

त्यामुळे पोलिस सावर्डेकर कुटुंबीयाला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप सुरू झाले होते. दरम्यानच्या काळात दिवाडीवासीयांनीही फडते दांपत्याच्या मृत्यूला न्याय देण्याची मागणी करत म्हार्दोळ पोलिस स्थानकावर मोर्चा नेला होता.

कुंभारजुवेच्या आमदारांनीही दिवाडीवासीयांना पाठिंबा दिला होता. त्यावेळी म्हार्दोळ पोलिसांनी मेघना सावर्डेकर हिला चौकशीसाठी बोलावण्याचे आश्‍वासन दिल्याने जमाव त्या रात्री परतला होता.

पोलिसांच्या या आश्‍वासनानंतर मेघना सावर्डेकर हिने दुसऱ्या दिवशी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता.

Court
President Murmu On Goa Visit: गोव्‍यातील विविधतेतील एकता आदर्शवत; अनमोल निसर्गसंपदा जपण्याचे राष्ट्रपतींचे आवाहन

डॉ. मधू घोडकिरेकर यांच्या देखरेखीखाली चाचणी

मडगाव येथील जिल्हा इस्पितळात न्यायवैद्यक विभाग प्रमुख डॉ. मधू घोडकिरेकर यांच्या देखरेखीखाली ही चाचणी घेतली गेली. यापूर्वी 11ऑगस्टला परेश सावर्डेकर याचीही अशीच चाचणी डॉ. घोडकिरेकर यांनी घेतली होती.

Court
Margao News: डॉक्टरांविरुद्धचा 'तो' प्रकार खंडणीसाठी? युवतीचा मित्र पोलिसांच्या रडारवर, प्रकरणाला कलाटणी

उद्या दोन मुलांची जबानी

म्हार्दोळ पोलिसांनी मेघना सावर्डेकर हिला तीनवेळा समन्स बजावून चौकशीसाठी पोलिस स्थानकात येण्याची नोटीस दिली होती. त्या नोटिशीला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, त्यावरील सुनावणी अजून प्रलंबित आहे.

सध्या या प्रकरणाचा तपास क्राईम ब्रँचच्या विशेष पथकाकडून सुरू आहे. मेघना सावर्डेकर व तिच्या एका मुलाची न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर जबानी नोंद झाली आहे, तर येत्या २४ रोजी तिच्या इतर दोन मुलांची जबानी न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर होणार आहे.

Court
Banastarim Bridge Accident: ‘सीट पोझिशन’ वरुन होणार घटनेचा उलगडा , कारचालक कोण हे लवकरच समजणार

प्रतिकात्मक माहोल

या चाचणीविषयी डॉ. घोडकिरेकर यांना विचारले असता ‘अशी चाचणी घेण्यात आली असून, मी माझे निष्कर्ष काय आहेत ते पोलिसांना सादर करेन’, असे त्यांनी सांगितले. ‘अशा चाचणीतून कोण कुठे बसले होते ते कळू शकते’, असे ते म्हणाले. यासाठी अपघाताचा प्रतिकात्मक माहोल तयार करण्यात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com