Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak

Goa Accident: कदंब पठारावर भरधाव गाडीच्या धडकेत तरुण ठार

Goa Accident: कदंब पठारावर अपघात : पसार चालकाला कुळे येथे अटक
Published on

Goa Accident: पणजी- कदंब पठारावरील रस्ता ओलांडत असताना पणजीहून जुने गोवे दिशेने जाणाऱ्या भरधाव वेगात असलेल्या गाडीने पश्‍चिम बंगालचा हरलाल मुर्मू (29) याला धडक दिली.

या धडकेने तो जागीच ठार झाला तर गाडीने धडक दिल्यानंतर चालक गाडी घेऊन तेथून पसार झाला. हा अपघात रविवारी (ता.8) सायंकाळी 7 वा.च्या सुमारास घडला.

पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरलेली गाडी कुळे चेकनाक्यावर पकडली व चालक बाबू के.एस.ओ. कुमार याला अटक केल्याची माहिती जुने पोलिस स्थानकाचा ताबा असलेले निरीक्षक विक्रम नाईक यांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्नाटक नोंद असलेली इर्टिगा गाडी कदंब पठाराच्या रस्त्याने भरधाव वेगाने जुने गोवेच्या दिशेने जात होती.

हरलाल मुर्मू हा रस्ता ओलांडत असताना गाडीने त्याला ठोकर दिली. या ठोकरीने तो रस्त्यावर जोरात आदळला.

Goa Accident
Porvorim Drug Case: पर्वरीत 2.5 लाखांचे ड्रग्ज जप्त ; नायजेरियन नागरिकाला अटक : गुन्हे शाखेची कारवाई

त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन रक्तस्राव झाला. या अपघातानंतर गाडी चालक तेथे न थांबता तसाच निघून गेला. या अपघातानंतर तेथील काही वाहनचालकांनी जुने गोवे पोलिस तसेच 108 रुग्णवाहिकेला फोन केला.

रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली व केलेल्या प्राथमिक तपासणीत त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी या अपघाताचा पंचानामा करून मृतदेह गोमेकॉ इस्पितळातील शवागारात पाठवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com