Porvorim Drug Case: पर्वरीत 2.5 लाखांचे ड्रग्ज जप्त ; नायजेरियन नागरिकाला अटक : गुन्हे शाखेची कारवाई

Porvorim Drug Case: जीसीए मैदानाजवळ एक नायजेरियन संशयास्पद ग्राहकाची वाट पाहत असल्याची उभा असल्याचे दिसले.
Crime Branch
Crime BranchDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Porvorim Drug Case: पणजी, गुन्हा अन्वेषण विभागाच्या गुन्हे शाखेने काल मध्यरात्रीनंतर पर्वरी येथील ‘जीसीए’ मैदानाजवळ नायजेरियन फेर्दिनांद उडोजी ओकोक्वो (४९) याला १० ग्रॅम कोकेन व १८.८४ ग्रॅम एमडीएमए पावडरसह अटक केली.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत २.५ लाख रुपये असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दत्ताराम राऊत यांनी दिली. संशयिताची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

पर्वरी परिसरात रात्रीच्यावेळी ड्रग्ज विक्रीसाठी काही नागरिक संशयास्पद फिरत असल्याची माहिती मिळाली होती.

त्यामुळे काल रात्रीपासूनच या भागात पोलिस पथकाने गस्त सुरू केली होती. जीसीए मैदानाजवळ एक नायजेरियन संशयास्पद ग्राहकाची वाट पाहत असल्याची उभा असल्याचे दिसले. तो बराच वेळ तेथेच होता.

त्यामुळे त्याची झडती घेण्यात आली तेव्हा त्याच्याजवळ असलेल्या पिशवीत कोकेन व एमडीएमए पावडर सापडली.

त्याच्याकडे असलेले ४ हजार रुपये व मोबाईल फोनही जप्त करण्यात आला. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Drug Case
Porvorim Gun Firing Case
Liberian Drug Accused Goa
Virendra Singh Baisoya Drug Mafia Deported Dubai
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com