Ayodhya Ram Mandir: सोमवारी मद्य, मांसाहारी पदार्थांवर बंदी; राज्यात अनेक पंचायतींचा मोठा निर्णय

Ayodhya Ram Mandir: श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेपनेनिमित्त निर्णय : माशेल, कुंभारजुवे, खांडोळानंतर अस्नोड्यातही निर्णय
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram MandirDainik Gomantak
Published on
Updated on

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत होणाऱ्या प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या दिवशी म्हणजेच सोमवारी (ता. 22) राज्यातील मंदिरे आणि धार्मिक स्थळांवर श्री राम पूजन मोठ्या उत्साहात करण्यात येणार आहे.

या दिवशी राज्यातील अनेक ग्रामपंचायतींनी त्यांच्या क्षेत्रात मद्य, मांसाहारी पदार्थ विक्रीवर बंदी केली आहे. माशेल, कुंभारजुवे, खांडोळानंतर अस्नोड्यातही आज पंचायत मंडळाने तसा निर्णय घेऊन गावात नोटीस जारी केली आहे. मात्र, काही नागरिकांनी पंचायतींना फोन करून ‘ही बंदी कशासाठी’ असा सवाल केला आहे.

Ayodhya Ram Mandir
पुन्हा हादरला गोवा! हॉटेल मॅनेजरने बीचवर केला पत्नीचा खून, पोलिसांना म्हणाला अपघाताने बुडाली पाण्यात

अस्नोडा पंचायत क्षेत्रात कडक शाकाहार पाळण्यात येणार आहे. या ऐतिहासिक दिवशी पंचायत क्षेत्रात मद्यासह मासळी चिकन आदी मासाहारी खाद्यपदार्थ विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

तसा निर्णय अस्नोडा पंचायतीने घेतला असून, नोटीसही जारी केली आहे. सरपंच फ्रांसिस वाझ आणि अन्य पंचसदस्यांच्या उपस्थितीत उपसरपंच सपना मापारी आणि पंचसदस्य यशवंत साळगावकर यांनी शनिवारी (ता.20) ही माहिती दिली.

यावेळी मिलेश नाईक आणि अन्य पंचसदस्य उपस्थित होते. श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा हा ऐतिहासिक आणि धार्मिक सोहळा आहे.

या हेतूने पंचायत क्षेत्रातील मद्यालये, चिकन सेंटर, मासळी मार्केट, फास्ट फूड स्टॉल बंद एका दिवसासाठी म्हणजेच सोमवारी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती सपना मापारी आणि यशवंत साळगावकर यांनी दिली.

Ayodhya Ram Mandir
Goa Road Accident: गोव्यात अपघातांची मालिका सुरूच; शनिवारी दोन घटनांत दोघे गंभीर

माशेल, कुंभारजुवे, खांडोळ्यातही सोमवारी मद्यासह मांसाहारी पदार्थ विक्री बंद राहणार आहे. याबाबत तिन्ही पंचायतीतर्फे विशेष आवाहन केले आहे.

त्यासंबंधी पब्लिक नोटीस काढली असून सरपंच जयेश नाईक (माशेल), नंदकुमार शेट (कुंभारजुवे), विशांत नाईक (खांडोळा) यांनी ग्रामस्थ, तसेच दुकानदारांना मद्य, मांस विक्री बंदचे आवाहन केले आहे.

कुंभारजुवेत श्रीराम मंदिरात घरोघरी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यामुळे मद्य, मांसाहार विक्रीबरोबरच मांसाहारी हॉटेल, धाबे, चायनीज दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन पंचायतीने केले आहे.

त्याचप्रमाणे तिवरे-वरगाव पंचायतीने पब्लिक नोटिशीद्वारे मांसाहाराबरोबरच मद्य विक्रीची दुकाने व बार, हॉटेल बंद ठेवावी, असे नोटिशीत म्हटले आहे.

माशेल पंचक्रोशीत शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण मंदिर, देवकीकृष्ण मंदिर, तिवरे, वरगावातील मंदिरे, भगवती मंदिर, खांडोळ्यात सातेरी मंदिरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. त्यामुळे पंचायतीने हे निवेदन केले आहे.

सोमवारी बँकांना सुटी:-
अयोध्येतील श्री राम मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित्त सोमवारी राज्य सरकारने सर्व शाळा तसेच सरकारी कार्यालयांना सुटी लागू केली होती. मात्र, आज प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार बँकांनाही सुटी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारी कार्यालये, शाळा, बँका आणि इतर आस्थापनेही सोमवारी बंद असतील.

शेअर बाजार शनिवारी बंद:-
शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच आज शनिवारची सुटी रद्द करण्यात आली. शेअर बाजारात आज नियमितपणे कामकाज सुरू राहिले. मात्र, सोमवार, ता. 22 रोजी अयोध्येतील श्री राम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त शेअर बाजार बंद राहील, असे जाहीर करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com