पुन्हा हादरला गोवा! हॉटेल मॅनेजरने बीचवर केला पत्नीचा खून, पोलिसांना म्हणाला अपघाताने बुडाली पाण्यात

गौरव पत्नीला खडकाळ भागात घेऊन गेला आणि त्यानंतर झालेल्या वादातून पत्नीला समुद्राच्या पाण्यात बुडवले.
Goa Murder Case
Goa Murder Case
Published on
Updated on

Goa Murder Case: राज्यात एका महिन्यात दुसरी खूनाची घटना समोर आली आहे. राजबाग-काणकोण बीचवर पतीकडून पत्नीचा खून करण्यात आला असून, संशय येऊ नये म्हणून पतीने अपघाताचा बनाव केला.

शुक्रवारी (दि.19) दुपारी 3.45 वाजता ही घटना घडली. कुंकळ्ळी पोलिसांनी याप्रकरणी संशयित पतीला अटक केली आहे.

गौरव कटियार (29, रा. कोलवा, मूळ लखनऊ) असे अटक करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे.

तर, दीक्षा गंगवार (वय 27, लखनऊ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव पत्नी दीक्षासह राजबाग-काणकोण येथील काब-दी-रामजवळ फिरण्यासाठी म्हणून गेले होते. गौरव पत्नीला खडकाळ भागात घेऊन गेला आणि त्यानंतर झालेल्या वादातून पत्नीला समुद्राच्या पाण्यात बुडवले.

पण, पत्नी आईस्क्रीम खरेदी करण्यासाठी गेली असता अपघाताने पाण्यात बुडाली, असे संशयित पती गौरवने पोलिसांना सांगितले.

या घटनेसंबधित समोर आलेल्या व्हिडिओत संशयित पती पत्नीचा मृतदेह बाहेर काढताना दिसत आहे. संशयिताने पत्नीचा खरच मृत्यू झाला आहे की नाही हे देखील पाण्यात जाऊन तपासले. स्थानिकांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी संशयित गौरवची चौकशी केली असता त्याची उत्तरे संशयास्पद आढळून आली, असे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, पोलिसांच्या सखोल चौकशीनंतर संशयित गौरवने पत्नीच्या खूनाची कबुली दिली आहे.

एक वर्षापूर्वीच दोघांचे लग्न झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. आरोपीचे विवाहबाह्य संबंध होते आणि म्हणून त्याने पत्नीचा खून करण्याचा कट रचल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले आहे.

प्राथमिक अंदाजात पाण्यात बुडून गुदमरून महिलेचा मृत्यू झाल्याचे दिसते. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Ghaziabad Double Murder Case
Telangana School Principal Murder Case
Congress Leader Shot Dead
Goa Uncle Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com