Panchayat Election : पंचायत निवडणुकीत एअरहोस्टेससह अनेक नवोदित उमेदवारांचा विजय

निवडणुकीत विविध क्षेत्रातील लोकांनी आपले नशीब आजमावले असून अनपेक्षित विजयही प्राप्त केला आहे.
Goa Panchayat Election
Goa Panchayat ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Panchayat Election : 10 ऑगस्ट रोजी राज्यातील 186 पंचायतींसाठी निवडणूक पार पडली. काल (12 ऑगस्ट) रोजी पंचायत निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून यामध्ये अनेक नव्या चेहऱ्यांचा समावेश आहे. निवडणुकीत विविध क्षेत्रातील लोकांनी आपले नशीब आजमावले असून अनपेक्षित विजयही प्राप्त केला आहे.

(Goa Panchayat Election)

Goa Panchayat Election
Uday Madkaikar : उदय मडकईकर यांचे बाबूश यांच्याशी ‘गुफ्तगू’

एअरहोस्टेसचा समाजासाठी भावी दृष्टिकोण

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेली माजी एअरहोस्टेस, शैना कैरोने शुक्रवारी तिची पहिली निवडणूक वेळीमधील महिलांसाठी राखीव असलेल्या प्रभागातून लढून 38 मतांच्या फरकाने विजय मिळवला आहे. किंगफिशर एअरलाइन्स आणि कतार एअरवेजमध्ये 1010 वर्षांहून अधिक काळ केबिन क्रू म्हणून तिने काम केले आहे. दरम्यानच्या 5 वर्षांपासून तिने आपले एअरहोस्टेसचे काम सोडले होते.

निवडणूक लढवण्याचा निर्णय का घेतला?

शैना म्हणाली की, 'मला एक नवीन सुरुवात हवी होती. मला बदल घडवायचा आहे, त्यामुळे मी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता विजयी झाल्यावर मी येथील रस्त्यांवरील दिवे आणि कचऱ्याच्या समस्येवर प्रामुख्याने लक्ष देणार असून या गोष्टींवर काम करणार आहे.

खलाशांच्या कल्याणासाठी काम करणार

तर दुसरीकडे, चिंचणी आणि केळशीमध्ये, गोवा नाविक असोसिएशन ऑफ इंडियाचे सह-संस्थापक, फ्रँक व्हिएगस आणि डिक्सन वाझ हे दोघेही त्यांच्या पहिल्याच पंचायत निवडणुकीत त्यांच्या संबंधित गावातील प्रभागांमध्ये विजयी झाले. व्हिएगसने 2019 पर्यंत दोन दशकांहून अधिक काळ मर्चंट नेव्हीमध्ये काम केले. त्याने 95 मतांनी विजय मिळवला आहे.

व्हिएगस म्हणाले की, चिंचणीमध्ये तसेच राज्याच्या इतर भागांतील खलाशांच्या मोठ्या समुदायाने आजवर पडद्यामागून काम केले आहे. मला त्यांच्या कल्याणासाठी काम करायचे आहे.

एकंदरीत यंदाच्या पंचायत निवडणुकीत चुरशीची लढत दिसून आली. मतदारांचा संमिश्र प्रतिसाद जरी मिळाला असला तरी बदल घडवून आणण्याच्या हेतूने सुजाण मतदारांनी अनेक नवोदित उमेदवारांना संधी दिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com