Goa Panchayat Election : धाकधुक वाढली; गोव्यातील 186 पंचायतींचा आज निकाल

सकाळी आठपासून मतमोजणीला प्रारंभ; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
Goa panchayat election
Goa panchayat electionDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Goa Panchayat Election : राज्यातील 186 पंचायतींच्या झालेल्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज शुक्रवारी 12ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ठिकठिकाणच्या मतमोजणी केंद्रावर सुरुवात होणार आहे. 1 हजार 464 सदस्य या मतमोजणीतून निवडले जाणार आहेत. निवडणूक आयोगाने या मतमोजणीची पूर्ण तयारी केली असून, मतमोजणी केंद्राजवळ गर्दी होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात येणार आहे.

बुधवारी राज्यात पार पडलेल्या पंचायत निवडणुकीत मिस-मॅचमुळे स्थगित ठेवण्यात आलेले कळंगुटच्या प्रभाग 9 चे मतदान गुरुवारी उत्साहात झाले. पाच वाजेपर्यंत प्रभागातील एकूण ९५२ पैकी 752 मतदारांनी हक्क बजावला. दरम्यान, या निवडणुकीत अनेक मंत्री, आमदार, माजी आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पंचायतींचा निकाल जाहीर होताच जल्लोषाची तयारी करण्यात आली आहे.

Goa panchayat election
Goa School Merger : सरकारचे खासगी शाळांना प्रोत्‍साहन; आपचा आरोप

मतमोजणीची ठिकाणे

उत्तर गोवा : तिसवाडी : डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियम, बांबोळी. सत्तरी : कदंब बसस्थानक सभागृह, वाळपई. बार्देश : पेडे स्पोर्टस् कॉम्प्लेक्स, पेडे. पेडणे : सोहिरोबानाथ आंबिये शासकीय महाविद्यालय, विर्नोडा. डिचोली : नारायणे झांट्ये महाविद्यालय वाठादेव सर्वण.

दक्षिण गोवा : सासष्टी : माथानी साल्ढाना प्रशासकीय इमारत, मडगाव. फोंडा : शासकीय आयटीआय फर्मागुढी, फोंडा. सांगे : शासकीय क्रीडा कॉम्प्लेक्स, खैरीकाटे. धारबांदोडा : शासकीय कार्यालय कॉम्पल्केस, धारबांदोडा. काणकोण : मामलेदार कार्यालय, काणकोण. केपे : शासकीय क्रीडा कॉम्प्लेक्स, बोरमोळ-केपे. मुरगाव : रविंद्र भवन, मुरगाव.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa High Court SIR hearing
Cooperative societies financial transparency
Goa River Pollution
Shivaji Maharaj Statue Headland Sada
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com