Panchayat Election : काणकोण तालुक्यात संमिश्र प्रतिसाद; 77.53 टक्के मतदान पार

काणकोण तालुक्यातील पैंगीण पंचायतीच्या आमोणे वार्डात विक्रमी मतदान होण्याची शक्यता आहे.
Canacona Panchayat Election
Canacona Panchayat Election Dainik Gomantak
Published on
Updated on

काणकोण : काणकोण तालुक्यातील पैंगीण पंचायतीच्या आमोणे वार्डात विक्रमी मतदान होण्याची शक्यता आहे. या वार्डातून सभापती रमेश तवडकर यांच्या पत्नी सविता तवडकर निवडणूक लढवित आहे. सकाळी 8 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत काणकोणमध्ये 77.53 टक्के मतदान झाले आहे.

Canacona Panchayat Election
Goa Panchayat Election: ग्रामपंचायत निवडणुकांसाठी राज्यात एकूण 79 टक्के मतदान

पैगीण पंचायतीच्या मार्ली वार्डातील काळशी, चिपळे व अन्य वाड्यावरील मतदारांनी सलग तीन वेळा वार्ड राखीव ठेवण्यात आल्याने निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय जाहीर केला होता.

मात्र मामलेदार मनोज कोरगावकर यांनी त्यांची समजूत काढून मतदानास त्यांना राजी केले. मतदान केंद्र चिपळे व अन्य भागापासून 19 किलोमीटर दूर आहे त्यासाठी या मतदारांसाठी खास बसची सोय करण्यात आली. मात्र ती निवडणूक निर्वाचन अधिकाऱ्यानी केली की अन्य कोणी केली ते अद्याप स्पष्ट झाले नाही मात्र चिपळे येथील काही मतदार मतदानासाठी या बसने मार्ली मतदान केंद्रावर गेले. या मतदान केंद्रावर 614 मतदार आहेत त्यापैकी सर्वाधिक मतदार चिपळे,खरेगाळ,काळशी या भागातील आहेत.

दरम्यान, वेर्णा पोलिस स्थानकाचे हवालदार बाबुसो पालकर (रा. फोंडा) यांचे कर्तव्यावर असताना निधन झाले. पालकर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना दक्षिण गोवा जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान पालकर यांचा मृत्यू झाला. आज सकाळी आठ वाजता बाबुसो पालकर कामावर हजर झाले. त्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्रास सुरू झाला अशी माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com