Goa panchayat Election 2022: कोविडबाधित नागरिक ही करणार मतदान

ग्रामपंचायत निवडणुकीत रंगत वाढली
Vote
Vote Dainik Gomantak
Published on
Updated on

गेले काही दिवस पंचायत निवडणुकीने गोव्याच्या राजकारणात रंगत चढली आहे. बाजी मारणार कोण ? यासाठी सर्व पक्ष ताकदीने उतरले असून काल प्रचाराचा अखेर झाला. उद्या मतदान असल्याने आता प्रचाराच्या फैरी म्यान झाल्या आहेत.

(Goa panchayat election 2022 Citizens affected by Covid will vote)

Vote
Aam Aadmi Party : गोव्यात ‘आप’ला राज्य पक्ष म्हणून मान्यता

मात्र उद्या मतदान असल्याने सर्व उमेदवारांचा निकाल दोन दिवसात लागणार आहे. असे असले तरी या निवडणूकीत आता कोरोना रुग्ण ही मतदान करणार आहेत. निवडणुक आयोगाने 186 पंचायतीसाठी कार्यक्रम जाहीर केला असून 10 ऑगस्टला मतदान होणार आहे. 10 तारखेला मतदान व 12 ऑगस्टला मतमोजणी घेण्यात येणार आहे.

Vote
राज्यातील प्रशासकांमुळे विकासकामे खोळंबली

18 ते 27 अर्ज स्वीकारले पंचायत निवडणुकीसाठी यापूर्वीच वर्गीकृत जाती-जमाती, इतर मागासवर्गीय वर्गाच्या आरक्षणाच्या मुद्याने बराच वेळ हा मुद्दा न्यायलायत प्रलंबित होता. मात्र आता हे मुद्दे निकालात निघाला असून 12 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मतमोजणीने या निवडणूकिचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Goa Panchayat Election|बार्देशात शेवटपर्यंत प्रचाराचा धुरळा!

म्हापसा: पंचायत निवडणुकीच्या प्रचाराची सांगता आज सोमवारी झाली. मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या जाहीर प्रचार संपला असला, तरी मतदानाच्या दिवसापर्यंत सोशल मीडियावर प्रचाराचा धुरळा उडणार आहे. शेवटच्‍या क्षणापर्यंत उमेदवारांनी प्रचार केला.

या पंचायत निवडणुकीनिमित्त बार्देश तालुक्यात घरोघरी प्रचार, कोपरा बैठकांचे आयोजन केले जात होते. दिवसभरात जो प्रचार केला, त्याचे नंतर व्हिडीओ संबंधितांकडून सोशल मीडियावर व्हायरल केले जायचे. सोमवारी (ता.8) जाहीर प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच उमेदवारांनी सकळापासूनच, जास्तीत जास्त मतरापर्यंत पोहोचून आपले चिन्ह पोहोचविण्याचे काम केले. अनेक उमेदवारांनी आपली दोन ते तीन फेऱ्या पूर्ण केल्या होत्या आणि प्रत्येकजण आपल्या विजयाची खात्री देण्याचा दावा करताना दिसले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com