मुरगाव तालुक्यातून 302 उमेदवारी अर्ज दाखल

मुरगाव तालुक्यात शेवटच्या दिवशी 66 इच्छुक उमेदवारांनी दाखल केली उमेदवारी
Nomination
NominationDainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: पंचायत निवडणुकीसाठी आज सोमवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मुरगाव तालुक्यातील सातही पंचायतीत मिळून एकूण 66 इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरले. मुरगाव तालुक्यातील सातही पंचायतीतून एकूण उमेदवारी अर्ज संख्या 302 एवढी झाली असून, उद्या मंगळवारी अर्जांची छाननी होईल. (Goa Panchayat Election 2022; 302 nominations filed from Mormugao taluka )

मुरगाव तालुक्यात पंचायत निवडणुकीसाठी आज सोमवारी अर्ज भरण्याच्या सातव्या दिवशी 66 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. आज दाखल करण्यात आलेले अर्ज केळशी पंचायतीतून कोसेसाव वास (प्रभाग 2), फिलीप सिल्वा (प्रभाग 6), स्वूशी डीसोजा (प्रभाग 7) एकूण 3अर्ज दाखल करण्यात आले.चिकोळणा बोगमाळो पंचायतीतून एकही अर्ज नाही.

Nomination
Goa: म्हापसा येथील कदंब बस स्टँड बनलं अमली पदार्थ सेवनाचे केंद्र?

कुठ्ठाळी पंचायतीतून मेलबिनो वाझ, अनिता केंकरे, (प्रभाग 1) रेमंड डीसा, सेनिया पेरेरा (प्रभाग 2), रुयेला फर्नांडिस, ब्रिटनी रॉड्रीगिस (प्रभाग 3), मॅन्युअल सिल्वा,ओस्वीन सिल्वा(प्रभाग 4), अँथनी फर्नांडिस, मारियानो डायस, एदोसीयाना रोड्रीक्स संतोष रायकर (प्रभाग 5), फ्रान्सिस्को फर्नांडिस, दामोदर नाईक(प्रभाग 6), ओलिंडा लोबो, फातिमा लुकास, फ्रान्सिस्का वाझ (प्रभाग 7), जोस कोलाको, एंजेला फुतोदो,जोआव मोंतेरो(प्रभाग 8), विश्रांती गांवकर, सांतानो डा गामा, मायकल डीसा, लॉरेन्स मिस्किता, आगूस्तो तावारीस (प्रभाग 9), लिडिया क्लायमेट, संतान कोलाको, उज्वला नाईक, ग्रेटा बार्रेटो जूस्टिन रेबेलो, लता नाईक, दिव्या रायकर(प्रभाग 11) एकूण 32अर्ज दाखल झाले.

वेलसाव पाले इसोरशी पंचायतीतून ईडालीना ब्रागांका (प्रभाग 3) एकूण एक अर्ज दाखल करण्यात आला.साकवाळ पंचायतीतून आरिष कादर, सागर देसाई, गिरीष पिल्ले (प्रभाग 1),डेरीक वालेस (प्रभाग2), पावलो सौजा,आलक नाईक (प्रभाग 3), मारिया आझावेदो (प्रभाग 4), अन्नपूर्णा मेट्टी (प्रभाग 7), चंद्रशेखर भिंगी (प्रभाग 8),सकीना मुंडेवाल, ललित पाटील(प्रभाग 9), लक्ष्मी लमाणी (प्रभाग 10), अरविंद अक्की, गिरीश पिल्ले, परशुराम दोड्डामणी (प्रभाग 11) एकूण 15 अर्ज दाखल झाले.

Nomination
चिखली, दाबोळी येथील 'ती' अतिक्रमणे हटवावी लागणार

चिखली पंचायतीतून रामकृष्ण गावकर (प्रभाग 1), स्टेफनी लूकास (प्रभाग 2), स्विझेल आंद्रादे (प्रभाग 3), हेमंत फडते, सर्वेश अक्कसली (प्रभाग 5), शैलेश मयेकर (प्रभाग 7), प्रीतम गावडे (प्रभाग 11) एकूण सात अर्ज दाखल केले.

कासावली पंचायतीतून कायतानो मोंतेरो(प्रभाग 1), फिलोमेना साल्ढाणा (प्रभाग 3), ललित मार्टिन्स, पीटर डीकॉस्टा(प्रभाग 5), अनिता डिमेलो, मारिया कारवालो(प्रभाग 7), फ्रँकलिन कोस्ता (प्रभाग 8), रितेश सतारकर(प्रभाग 9) एकूण 8 अर्ज दाखल झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com