चिखली, दाबोळी येथील 'ती' अतिक्रमणे हटवावी लागणार

गाडे धारक घेणार पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो यांची भेट
Dabolim News
Dabolim News Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: चिखली, दाबोळी येथे सर्कल जवळील पार्क समोरील गाड्यांच्या अतिक्रमणाविरोधात नौदलाकडून पंचायतीला तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीला अनुसरून सात दिवसाच्या आत अतिक्रमणे हलवली नाही तर कडक कारवाई करण्यात येईल असे गाडे धारकांना पंचायत सचिवांनी नोटीसिद्वारे कळवले आहे. त्यामुळे गाडेधारकात नाराजी पसरली आहे. गाडे धारक पंचायत मंत्री मावीन गुदिन्हो यांची भेट घेणार आहे. ('Those' encroachments at Chikhli, Dabolim will have to be removed )

Dabolim News
दक्षिण गोव्यात मच्छीमारांना मिळाला सोलर कोळंबीचा बंपर कॅच

चिखली येथील मुख्य सर्कल पासून पाचशे मीटरच्या अंतरावर असलेल्या नेवल आर्मामेन्ट डेपो चिखली या नौदल कार्यालयाकडून पंचायतीसमोर तक्रार दाखल केली आहे की, चिखली पार्क समोर अतिक्रमण करून उभे करण्यात आलेल्या चहाच्या गाड्यामुळे नेव्हल आर्मामेन्ट डेपोची पूर्व गेट ते चिखली सर्कल दरम्यान संरक्षक रस्ता अडवला जातो. दरम्यान राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून रस्त्याच्या बाजूला अतिक्रमण केलेल्या गाड्यांपासून मुक्त करण्यासाठी आवश्यक कारवाई करावी अशी तक्रारीत नौदलाने मागणी केली आहे.

Dabolim News
सासष्टीतून तब्बल 994 उमेदवारी अर्ज दाखल

दरम्यान या तक्रारीच्या अनुषंगाने चिखली पंचायत सचिवाणी या गाडे धारकांना काढलेल्या नोटीसमध्ये पंचायतीकडून दिलेल्या परवान्यामध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीचे गाडे धारकांकडून उल्लंघन केले आहे. तर काही हात गाड्यांनी पंचायतीची परवानगी न घेता आपला व्यवसाय चालवला असल्याचे म्हटले आहे.

या सर्व बाबी लक्षात घेऊन आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टिकोनातून नौदलाकडून प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने सदर गाड्यांची परवानगी तत्काळ निलंबित करत असल्याचे म्हटले आहे. सदर नोटीस मिळताच सात दिवसाच्या आत बेकायदेशीर गाडे काढून टाकण्याचे निर्देश या नोटीसद्वारे दिले आहेत. असे न केल्यास पंचायत संबधित गाड्यावर कठोर कारवाई सुरू करून गाडी जप्त करणार त्यासाठी येणारा खर्च गाडे धारकाकडून वसूल केला जाईल. तसेच गाढेधारकांना पूर्व सूचना देऊन गाड्यांचा लिलाव केला जाईल असे या नोटीसित म्हटले आहे.

दरम्यान या नोटीस हातात पडल्याने गाडे धारकांनी नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या 40 वर्षापासून अधिक काळ आम्ही येथे व्यवसाय करत असून आज पर्यंत कोणतीच आडकाठी आली नव्हती. आता नौदलाने केलेल्या तक्रारीनुसार आमच्या गाड्यावर कारवाई करण्याची नोटीस पंचायती द्वारे दिली आहे. ही कितपत योग्य आहे असा सवाल या गाडेधारकांनी केला आहे. याविषयी आम्ही पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांच्याकडे दाद मागणार असल्याचे गाडेधारकांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com