Goa Panchayat Election: मूरगाव तालुक्यातून 16 अर्ज दाखल

पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भेटीगाटी वाढल्या
Mormugao News
Mormugao News Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्को: आज दाखल झालेले 16 अर्ज आणि काल मंगळवारी दुसऱ्या दिवशी दोन अर्ज असे दाखल करण्यात आलेल्या एकूण उमेदवारी अर्ज संख्या 18 झाली आहे. मूरगाव तालुक्यात पंचायत निवडणुकीसाठी आज तिसऱ्या दिवशी 16 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती निवडणूक अधिकारी कुंदन गडेकर यांनी दिली.

Mormugao News
Sanguem IIT: जीव गेला तरी आमची जमीन देणार नाही

सांकवाळ पंचायतीसाठी प्रभाग 1 मधून मावरेलीओ कारवालो यांचा एक उमेदवारी अर्ज दाखल केला.वेलसाव- पाले- इसोसी पंचायतीसाठी फ्रान्सिस्का बारेटो (प्रभाग 1), सिलविया रॉड्रीक्स व ईसाबेला गोम्स (प्रभाग 2), अंतोनियो रॉड्रीगिस(प्रभाग 3), जिम डिसोजा (प्रभाग 4) यांनी आपले एकूण 5 अर्ज सादर केले.

Mormugao News
Goa Panchayat Election: सासष्टीत पंचायत निवडणुकीचे जोरदार वारे

चिकोळणा बोगमाळो पंचायतीसाठी लॉरेना कून्हा (प्रभाग 1), कायतानो फिगेरदो ( प्रभाग 2),रोजारीयो क्रूज (प्रभाग3), जगन्नाथ महाले (प्रभाग 4), मेरी डिक्रुझ(प्रभाग 5), ऐश्वर्या थोरात(प्रभाग 6), अरुण नाईक (प्रभाग 7) यांनी आपले एकूण आठ अर्ज सादर केले. कुठ्ठाळी पंचायतीसाठी मायकल डीसा(प्रभाग9),सांतान कोलाको (प्रभाग 10) एकूण दोन अर्ज सादर केले.

मूरगाव तालुक्यातील 7 ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी दोन निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आले आहे. मामलेदार कार्यालयात तीन ठिकाणी सात पंचायतीचे अर्ज स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक अधिकारी म्हणून मामलेदार रणजीत साळगावकर तर साहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून कुंदन गडेकर काम पाहत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Calangute Police Mobile Theft Arrest
Margao Woman Cheated 33 lakhs
GMC cardiology department staff protest
ED Raids Goa Delhi Karnal
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com