Sanguem IIT: जीव गेला तरी आमची जमीन देणार नाही

सांगेच्या शेतकऱ्यांचा निर्धार: आयआयटीमुळे आम्ही उध्वस्त होणार नाहीत
Sanguem
Sanguem Dainik Gomantak

सांगे: सांगे येथे येणाऱ्या आयआयटी प्रकल्पाला सर्वांचा पाठिंबा आहे असे जरी चित्र उभे करण्यात येत असले तरी स्थानिक शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध असून जोपर्यंत जीवात जीव आहे. तोपर्यंत आम्ही आमची जमीन या प्रकल्पाला देणार नाहीत असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. (Citizens of Sanguem oppose the IIT project )

Sanguem
Goa Panchayat Election: सासष्टीत पंचायत निवडणुकीचे जोरदार वारे

आज नियोजित आयआयटी प्रकल्पाच्या जागेवर या शेतकऱ्यांनी निदर्शने केली त्यात महिलांची उपस्थिती जास्त होती. यावेळी बोलताना मारिया क्रूझ या महिलेने आम्ही मागची कित्येक वर्षे या जागेत काजूचे उत्पन्न घेत असून ही जमीन आमचे पोट आहे. आयआयटीसाठी आम्ही आमचे पोट मारू देणार नाही असे त्या म्हणाल्या.या जमिनीत 50 पेक्षा जास्त शेतकरी कुटुंबे पीक घेत आहेत.

Sanguem
गोवा फुटबॉल विकास परिषद स्थापनेचा निर्णय चुकीचा - युरी आलेमाव

मंत्री फळदेसाई यांनी या विरोधामागे सावित्री कवळेकर आहेत असे सांगून या आंदोलनाला राजकिय वळण देण्याचा प्रयत्न करू नये. या आंदोलनात कवळेकर यांचा कुठल्याही प्रकारचा संबंध नाही असे त्या म्हणाल्या. यावेळी मॅनफा क्रूझ या महिलेने सुभाष फळदेसाई हे दहशत वापरून हे आंदोलन मोडून काढू पाहतात. आम्ही आमचा विरोध दर्शविण्यासाठी जी सभा आयोजित केली होती ती फळदेसाई यांच्या गुंडांनी उधळून लावताना महिलांनाही धक्काबुक्की केली असा आरोप त्यांनी केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com