Utpal Parrikar Birthday Celebration : उत्पल पर्रीकरांना शुभेच्छा देताना मनोहरभाईंची आठवण; अनेकजण भावूक

Latest Goa News: वाढदिनी महालक्ष्मी मंदिरातच स्वीकारल्या सदिच्छा : वारसा जपला
Utpal Parrikar |Goa News
Utpal Parrikar |Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Latest Goa News: विधानसभा निवडणूक लढविल्यानंतर उत्पल पर्रीकर हे पणजीवासीयांच्‍या समस्‍या मांडताना अनेकदा दिसून आले. त्‍यांनी जनसंपर्कावर भर दिला आहे. लोकांचेही त्‍यांना भरभरून प्रेम मिळत आहे.

अनेकजण तर त्‍यांच्‍यात भाईंना पाहतात. शुक्रवारी उत्‍पल यांच्‍या वाढदिवसानिमित्त अशीच प्रचिती आली. वडिलांप्रमाणेच त्‍यांनीही पणजीतील श्री महालक्ष्‍मी मंदिरात चाहत्‍यांकडून शुभेच्‍छांचा स्‍वीकार केला.

दिवंगत मनोहर पर्रीकर यांच्‍या चाहत्‍यांच्‍या मोठ्या आग्रहास्तव चिरंजीव उत्पल पर्रीकर यांनी शुक्रवारी आपल्या वाढदिवसानिमित्त सायंकाळी 6 च्या सुमारास महालक्ष्मी मंदिरात देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी आपल्या समर्थकांकडून शुभेच्छा स्वीकारल्या. उत्पल यांच्याबरोबर जे विधानसभा निवडणुकीत वावरले त्यातील बहुतांश लोक यावेळी उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीनंतर पणजी भाजपमध्ये दोन गट पडले आहेत, त्यातील एक गट उत्पल यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, तर दुसरा गट पक्षाशी एकनिष्ठ राहिला आहे. असे असले तरी हे सर्व भाजपाचेच असल्याचे मानले जातात.

उत्पल यांना शुभेच्छा देण्यासाठी आलेल्यांची संख्या मोजकीच असली तरी ते त्यांचे कट्टर समर्थक आहेत. मंदिर परिसरात उत्पल यांनी शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रत्येकाबरोबर छायाचित्र काढले. त्यानंतर त्यांनी मंदिरात जाऊन देवीचे दर्शन घेतले. सुवासिनींनी त्यांना ओवाळल्यानंतर त्यांनी अनेकांशी संवाद साधला.

मोपाच्या नावाचा अधिकार सरकारला

मोपा विमानतळाला कोणाचे नाव द्यावे, हा सरकारचा निर्णय आहे. आपण सरकारच्या कामात कधीही हस्तक्षेप करीत नाही. त्यामुळे त्यांना ते ठरवू द्या, असेही उत्पल यांनी यावेळी सांगितले.

Utpal Parrikar |Goa News
Goa Politics News: मेशू डिकॉस्तांच्या विरोधात तडीपाराची कारवाई ; कार्यकर्त्यांमध्ये खळबळ

2019 च्या निवडणुकीत समर्थकांच्या मागणीमुळे अपक्ष म्हणून उतरलेल्या उत्पल यांना पराभव स्वीकारावा लागला. एका मुलाखतीत त्यांनी पणजीत निवडणुकीत उभे राहिलो, त्यामुळेच कमळ घट्ट झाल्याचा उपरोधिक टोला लगावला.

खड्डयांबाबत खूप तक्रारी :

पणजीत सध्या ठिकठिकाणी कामे सुरू आहेत. ही कामे करताना किमान संबंधित यंत्रणेने कालावधी निवडताना योग्यरितीने निवडायला हवा होता. इफ्फीमुळे रस्त्यांवरील वाहतूक वाढणार आहे, हे लक्षात घ्यायला हवे होते.

आपल्याकडे अनेकजणांनी तक्रारी केल्या आहेत. याबाबत आपण लवकरच वाहतूक पोलिस अधीक्षकांना भेटणार आहोत, त्यासाठी आपण त्यांची वेळही मागितल्याचे ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com