Shripad Naik Mopa Airport: मोपा विमानतळ, झुवारी पुलाचे पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्‍घाटन

Shripad Naik Mopa Airport: रोजगार मेळाव्यात 64 जणांना नियुक्तिपत्रे
Goa News | Shripad Naik
Goa News | Shripad NaikDainik Gomantak
Published on
Updated on

Shripad Naik Mopa Airport: नव्याने उभारलेला मोपा विमानतळ, आयुष इन्स्टिट्यूट व रुग्णालय आणि झुवारी पुलाचे उद्‍घाटन एकाच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होईल, अशी माहिती केंद्रीय पर्यटन, बंदर विकास राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे.

रोजगार मेळाव्याअंतर्गत,  नव्याने भरती झालेल्या सुमारे 71 हजार जणांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्‍य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तिपत्रांचा दुसरा टप्पा जारी केला. केंद्रीय मंत्री नाईक यांच्या हस्ते गोव्यातील 64 जणांना नियुक्तिपत्रे देण्यात आली. यावेळी ते बोलत होते.

सीआयएसएफ युनिट, ऑफिस ऑफ कमांडंट यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सीआयएसएफचे कमांडंट रणजितकुमार साहनी, एमपीएचे उपाध्यक्ष  गुरुप्रसाद राय यावेळी उपस्थित होते.

रोजगार मेळावा हे,  रोजगार निर्मितीला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेच्या  दिशेने टाकलेले पाऊल आहे. रोजगार मेळावा, भविष्यात रोजगार निर्मिती आणि तरुणांना अर्थपूर्ण संधी उपलब्ध करून देण्यासाठी उत्प्रेरक म्हणून काम करेल, अशी अपेक्षा आहे, असे नवनियुक्तांना संबोधित करताना मंत्री नाईक म्हणाले.

Goa News | Shripad Naik
Illegal construction at Vagator: वागातोर येथील अवैध बांधकामाला 5 लाखांचा दंड; अनेकांचे धाबे दणाणले

71 हजार जणांना नियुक्तिपत्रे

ऑक्टोबरमध्ये झालेल्या पहिल्या रोजगार मेळाव्याअंतर्गत नव्याने भरती झालेल्या देशभरातील 71 हजार जणांना नियुक्तिपत्रे देण्यात आली होती. विविध केंद्रीय सशस्त्र दलांमध्ये गृह मंत्रालयाकडून मोठ्या संख्येने पदे भरली जात आहेत.विविध सरकारी विभागांमधील सर्व नवीन नियुक्त्यांसाठी ऑनलाइन अभिमुखता अभ्यासक्रम सुरू केला आहे, असेही नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com