
Ramesh Tawadkar: करमल घाटातील रस्ता अरुंद असल्याने या रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते तसेच या अरुंद रस्त्यामुळे या घाटातील अनेक ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र वळणे आहेत. त्यामुळे प्राथमिक तत्त्वावर ही अपघातप्रवण क्षेत्र असलेली वळणे वन खात्याची परवानगी घेऊन काढली जाणार आहेत, परंतु रस्त्याच्या रुंदीकरणास वन खात्याचा अडथळा आहे.
या खात्याकडून तीन महिन्यात ना हरकत दाखला मिळाल्यास पुढील सहा महिन्यांत घाटातील रुंदीकरणाचे काम सुरू केले जाईल, अशी माहिती काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी दिली.
या घाटात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाहनांची संख्या वाढत आहे. या रस्त्यावरून अवजड वाहने धावत असल्याने अरुंद रस्त्याच्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत आहे. ही समस्या सुटावी असे काणकोणवासीय तसेच सरकारला वाटते.
या रस्त्याच्या कामाच्या प्रक्रियेत गोवा सरकार काहीसे मागे पडले आहे. हल्लीच केंद्रीय वाहतूक तसेच सार्वजनिक बांधकाममंत्री नितीन गडकरी यांनी प्राथमिक टप्प्यात रस्त्याच्या कामासाठी मान्यता दिली आहे. मात्र, अडचण आहे ती वन खात्याकडून या कामासाठी परवाना मिळण्याची.
ही परवानगी मिळाल्यास रुंदीकरणाच्या कामाला गती येईल तसेच होणारी वाहतुकीची कोंडी व रस्ता अपघातावर नियंत्रण येणार आहे, असे तवडकर म्हणाले.
सरकारचा केंद्राकडे पाठपुरावा
या घाटातील अनेक वळणे व अरुंद रस्ता ही वाहतुकीच्या कोंडीची मूळ कारणे आहेत. जोपर्यंत ही वळणे असलेला डोंगराळ भाग कापून रस्ता रुंद केला जात नाही, तोपर्यंत ही समस्या अशीच राहणार आहे.
राज्य सरकार या रस्त्यासाठी सर्व ते प्रयत्न करत आहे. केंद्राकडेही पाठपुरावा करत आहे. हा रस्ता रुंद झाल्यावर ही कोंडी कायमची सुटेल, असे तवडकर यांनी मत व्यक्त केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.