Goa News: ‘माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या दूरदृष्टीने ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, भाभा अणू संशोधन केंद्र, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी आणि इतर अनेक संस्थांची देशात स्थापना झाली. खऱ्या अर्थाने त्यांनी विकसित देशाचा पाया रोवला’, असे उद्गार विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी काढले.
काँग्रेस भवनात पंडित नेहरू जयंती सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर, दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, हळदोणेचे आमदार ॲड. कार्लोस आल्वारीस फेरेरा, वरिष्ठ उपाध्यक्ष एम. के. शेख, एनएसयूआयचे अध्यक्ष नौशाद चौधरी आदी उपस्थित होते.
पाटकर म्हणाले, नेहरू यांचे गोव्यावर विशेष प्रेम होते. गोव्याच्या अस्मितेची त्यांना नेहमीच काळजी असायची. तत्सम इतिहास हे स्पष्ट करतो की पंडित नेहरूंचा गोवा मुक्ती, जनमत कौल यावर प्रभाव आहे. त्यांच्या दूरदृष्टीचे रूपांतर कालांतराने गोव्याला घटकराज्य दर्जा मिळण्यात झाले.
खासदार सार्दिन म्हणाले, पंडित नेहरू हे जागतिक नेते होते, ज्यांनी जागतिक स्तरावर आदर मिळवला. त्यांची विचारधारा आणि व्हीजन पाळणे, हे भारतातील प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.