Goa News: डाळींचे दर वधारले; मात्र पामतेल उतरले

Goa News: केंद्राने पामतेलाची आयात वाढविली
Dal Rate | Goa News
Dal Rate | Goa NewsDainik Gomantak

Goa News: दिवसेंदिवस महागाईचे चटके बसतच आहेत. त्यात पणजीतील घाऊक बाजारात डाळींच्या दरात वाढ झालेली दिसून आली. मैदा, रवा, आटा यांच्याही दरात क्विंटलमागे 200 रुपयांनी वाढ झाली आहे. दुसऱ्या बाजूला मात्र पामतेलाचे दर उतरले आहेत.

एका बाजूला भाजीपाल्याचे दर चढेच आहेत, तर दुसऱ्या बाजूला जीवनावश्‍यक वस्तूंचेही दर वाढत आहेत. मध्यंतरी पामतेल व सूर्यफुलाच्या तेलाचे दर वाढलेले होते. त्यापैकी पामतेलाचे दर कमी झाले असून, घाऊक बाजारात 10 लिटरच्या बॉक्ससाठी 1 हजार 40 रुपये मोजावे लागतात.

यापूर्वी दहा लिटरच्या पिशव्यांच्या बॉक्ससाठी 1 हजार 450 रुपये द्यावे लागत होते. सूर्यफूलाच्या तेलाच्या दरात मात्र किंचित कमी झाल्‍याचे घाऊक व्यापारी धर्मेंद्र भगत यांनी दिली.

Dal Rate | Goa News
Bicholim River: मानवनिर्मित प्रदूषणातुन डिचोली नदी प्रदूषणमुक्त करण्यास सरकार अपयशी

मध्यंतरी पामतेलाच्या पिशवीसाठी दीडशे रुपये मोजावे लागत होते. किरकोळ विक्रेत्यांकडे ही पिशवी 160 ते 170 रुपयांना विकली जात होती. पण गरीब वर्गात सर्वात जास्त पामतेलाची मागणी असते. त्यामुळे केंद्र सरकारने खास करून पामतेलाची आयात वाढविली. त्‍यामुळे त्याच्या दरात कमी झाली आहे, असेही भगत यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com