Bicholim River: मानवनिर्मित प्रदूषणातुन डिचोली नदी प्रदूषणमुक्त करण्यास सरकार अपयशी

Bicholim River: कचरा, सांडपाण्यामुळे अस्वच्छता
Bicholim River | Goa News
Bicholim River | Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

Bicholim River: डिचोलीतून वाहणारी नदी प्रदूषणाच्या विळख्यात गटांगळ्या खात असून, दिवसेंदिवस या नदीत मानवनिर्मित प्रदूषणाचे आक्रमण वाढत असल्याचे आढळून येत आहे. कचऱ्यासह या नदीत सांडपाणी मिसळत असतानाच विविध ठिकाणी कपडे आणि गुरांना धुण्याचे प्रकार घडत आहेत.

या नदीतील गाळ उपसण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. गाळ उपसण्याची गरज आहे, असे मत पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केले.

मानवनिर्मिती कृतीमुळे या नदीत अनेक ठिकाणी अस्वच्छता निर्माण होत आहे. ही नदी प्रदूषणमुक्त होण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत, तर काही वर्षांनंतर नदीचे अस्तित्व पूर्ण धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.

तेव्हा आत्ताच संबंधितांनी लक्ष देणे गरजेचे आहे. स्वच्छ पाण्याची गरज लक्षात घेऊन प्रदूषणमुक्त नदीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

नदीची स्थिती

  1. कुडचिरे, वाठादेवहून डिचोली शहरातून वाहणारी नदी कारापूर येथे मांडवी नदीला जाऊन मिळतो.

  2. कुडचिरे ते डिचोलीपर्यंत या नदीवर आठ बंधारे आहेत. एकेकाळी म्हणजेच 25 वर्षांपूर्वी किरकोळ अपवाद वगळता ही नदी स्वच्छ दिसून येत होती. मात्र, हळूहळू ही नदी प्रदूषणाच्या विळख्यात अडकत गेली.

Bicholim River | Goa News
Sal River: ग्रामस्थांनी आवाज उठवावा -रॉयला फर्नांडिस

कारणे अशी...

  • काही ठिकाणी पाईपद्वारे बाहेरील पाणी या नदीत सोडण्यात येत आहे.

  • नदीला जोडलेल्या फाट्यातून नदीत अस्वच्छता पसरते.

  • सध्या खाण व्यवसाय बंद असला, तरी पावसाळ्यात धबधबा आदी काही ठिकाणी खनिजमिश्रित पाणी नदीत मिसळत असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com