गोवा (Goa) सरकारने 4 जुलै रोजी राज्यभरात कोव्हीड-19 मुळे लागु केलेल्या कर्फ्यूची मुदत 12 जुलैपर्यंत वाढवली आहे. तरी यावेळी सरकारने या कर्फ्युमध्ये बऱ्याच सवलची दिल्या असल्याचे पहायला मिळते आहे. त्यानुसार बार आणि रेस्टॉरंट्सला सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत 50 टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्याची परवानगी आहे. तर राज्यातील कॅसिनो मात्र 12 जुलैपर्यंत बंद राहतील. (Travelling Goa, Karnataka? Check out new guidelines)
माल वाहतुक करणारी वाहने (दोन ड्रायव्हर आणि एक मदतनीस) किंवा वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत काही अपवाद वगळता ईतर लोकांच्या आंतरराज्यीय हालचालींवर निर्बंध घालण्याचा निर्णय राज्याने घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर गोवा सरकारने राज्यात प्रवेश करणाऱ्यांसाठी कोविड-19 नकारात्मक अहवाल (Covid-19 Negative Report) अनिवार्य केला आहे.
कर्नाटक सरकारने देखील केले नियमात बदल
कर्नाटक सरकारने 1 जुलैपर्यंत राज्यात लागू करण्यात आलेले नियम शिथिल केले आहेत. तसेच शनिवार व रविवारचा कर्फ्यू उठविण्यात आला आहे, तर नाईट कर्फ्यू रात्री 9 ते पहाटे 5 पर्यंत सुरू राहणार आहे. नव्या नियमांनुसार सिनेमा, पब आणि थिएटर बंद राहतील. 100 पेक्षा कमी लोकांच्या उपस्थितीत विवाह आणि कौटुंबिक कार्ये करण्यास परवानगी असणार आहे. विशेष म्हणजे रेस्टॉरंट्समध्ये जेवण घेण्याची परवानगी देण्यात आली आहे.
कोविड-19 चा पहिला डोस घेतलेल्या केरळ मधुन कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या लोकांना निगेटिव्ह रिपोर्ट अनिवार्य नसणार आहे. त्याऐवजी आता प्रवेश करताना लसीकरणाचे प्रमाणपत्र दाखवु शकणार आहेत.
प्रशासकीय कर्मचारी आणि आरोग्य क्षेत्रात सेवा देणारे कर्मचारी, दोन वर्षाखालील मुले आणि आपत्कालीन परिस्थितीत प्रवास करणारे लोक (कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय उपचार इ. परंतु त्यांचे तपशील आवश्यक माहितीसह आल्यावर गोळा केले जातील) यांना आरटी-पीसीआर नकारात्मक रिपोर्टच्या नियमातुन सूट देण्यात आली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.