Girish Chodankar-Amit Patkar: काँग्रेसमध्ये पडद्याआड गटबाजी..!

Goa Politics News: पाटकर - चोडणकर समर्थकांत एकोपा येणार कधी ; वरिष्ठ नेत्यांचे दुर्लक्ष
Girish Chodankar-Amit Patkar |Goa News
Girish Chodankar-Amit Patkar |Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Politics News: काँग्रेसमधील आजी-माजी अध्यक्षांना मानणारे दोन गट निर्माण झाले आहेत. आठ आमदार फुटल्यानंतर काँग्रेसमध्ये ज्यापद्धतीने एकी दिसायला हवी होती, त्यापद्धतीने ती दिसली नाही.

अमित पाटकर यांच्या गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडल्यानंतर माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांना मानणाऱ्या अनेकांना ते पटलेले नाही. पक्षाचे सक्रिय सदस्य आणि पद असल्यामुळे ते अधून-मधून पक्षीय कार्यालयातील कार्यक्रमांना हजेरी लावतात एवढेच.

आठ आमदार फुटल्यानंतर काँग्रेसमध्ये तीन आमदार उरले, तिन्ही आमदारांची पहिलीच वेळ असल्याने तेही विधानसभेत नवखेच. त्यानंतर नव्या अध्यक्ष झालेल्या पाटकरांनी कर्मचारी भरती, म्हादईचा विषय, तूरडाळ-साखर वितरण प्रकरण अशा प्रकरणांवर पत्रकार परिषदा आणि प्रसंगी राज्यपालांना भेटून निवेदनेही दिले. याशिवाय पक्षाचे सर्व काही कार्यक्रमही ते आणि त्यांची टीम करीत असते.

दुसऱ्या बाजूला आठ आमदार फुटल्यानंतर चोडणकरांनी स्वतंत्र आमदार अपात्रता याचिका सादर केली, तर दुसरीकडे विधीमंडळाच्या बैठकीनंतर पाटकरांनी पुढील आठवड्यात आठ आमदारांविरोधी अपात्र ठरविण्याची याचिका सादर करण्याचा निर्णय घेतला आहे.

चोडणकर यांना मानणाऱ्या गटातील विजय भिके, अमरनाथ पणजीकर, ॲड. वरद म्हार्दोळकर, जनार्दन भंडारी अशी रस्त्यावर उतरणारी मंडळी पक्षात असली, तरी फारसे कार्यक्रमांना ती दिसत नाहीत.

भिके यांच्याकडून जिल्हाध्यक्षपद काढून घेतले असले, तरी ते सध्या फारच सक्रिय झालेले दिसतात. सतत ते म्हापशात पत्रकार परिषदा घेऊन विविध विषयांवरून सरकारवर टीका करीत असतात.

Girish Chodankar-Amit Patkar |Goa News
IffI 2022 Goa Grand Opening: चंदेरी दुनियेचा पेटारा आज उघडणार

त्याशिवाय पणजीकरांकडे माध्यम विभाग असल्याने त्यांना पक्षीय आदेश पाळावेच लागतात. ॲड. म्हार्दोळकर यांचा प्रदेश युवा काँग्रेस अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे ते पक्षात असले तरी त्यांच्या पणजीत येण्याच्या वाऱ्या फारच कमी झालेल्या दिसतात.

पाटकरांच्या आंदोलनाला सहभाग कमीच

गिरीश चोडणकरांच्या अध्यक्षतेखालील पक्ष जेव्हा आंदोलन करायचा तेव्हा काणकोणचे नेते जनार्दन भंडारी सर्वात आघाडीवर असायचे. वेगळ्या पेहराव्यामुळे पक्षात आपली वेगळी ओळख बाळून असलेले भंडारी हे आंदोलनात सक्रिय असायचे.

सरकारी कार्यालयात घुसण्याचा किंवा अधिकाऱ्यांना जाब विचारायचे झाल्यास भंडारी हवेच, असे समीकरण अनेक आंदोलनातून दिसून येत. पाटकरांना आंदोलनातून आपली शक्ती दाखविता आली नाही. त्यांनी परवा सांगेतील आयआयटीविरोधात सर्वपक्षीय वाहन रॅली काढली होती, परंतु ज्या अपेक्षेने लोक जमायला हवे होते, तेवढी संख्या दिसली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com