Pramod Sawant: रोजगार मिळालेल्यांची नावे यादीतून कमी करणार

Pramod Sawant: बेरोजगारीवरून संभ्रम : विरोधकांनी सरकारवर तोफ डागली आहे.
Pramod Sawant |  Amit Patkar
Pramod Sawant | Amit PatkarDainik Gomantak
Published on
Updated on

Pramod Sawant: राज्यातील बेरोजगारांची वेगवेगळी आकडेवारी समोर येत आहे. यात केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्रालय, तसेच राज्य रोजगार आणि कामगार आयुक्तालय वेगळीच माहिती देत आहे, तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आता राज्यात केवळ 20 हजारच बेरोजगार असल्याचा दावा करून थेट नीती आयोगाच्या माहितीलाच आव्हान दिले आहे. ही संभ्रमावस्था कायम असतानाच विरोधकांनी सरकारवर तोफ डागली आहे.

राज्यात मंगळवार आणि बुधवारी कामगार आणि रोजगार आयुक्तालयाने ‘मेगा जॉब फेअर’ भरवला होता. त्यात 21 हजार युवकांनी नोंदणी केली होती. प्रत्यक्षात 10 हजारांच्या आसपास तरुणांनी सहभाग नोंदवला. बुधवारी मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची नीती आयोगासोबत बैठक झाली. यात विविध विषयांसह राज्यातील बेरोजगारीवर चर्चा झाली.

यावेळी आयोगाने दिलेल्या अहवालामध्ये राज्यात 1 लाख 10 हजार तरुण बेरोजगार असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, मुख्यमंत्री सावंत यांनी आज केंद्राचे म्हणणे खोडून काढत ही माहिती चुकीची असल्याचे सांगितले. राज्यात जास्तीत जास्त केवळ 20 हजार बेरोजगार असतील, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र, नीती आयोग आणि राज्य सरकारची माहिती विसंगत असल्याने नेमक्या आकडेवारीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Pramod Sawant |  Amit Patkar
गोव्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त? जाणून घ्या आजचे नवीनतम दर...

मुख्यमंत्र्यांच्या मते, राज्यात केवळ 20 हजार तरुण बेरोजगार आहेत. यासाठी आवश्यक असलेले कौशल्य या युवकांनी मिळवले पाहिजे. प्रामुख्याने पर्यटन, क्रूझ लायनिंग, एव्हिगेशन या क्षेत्रातील कौशल्य आत्मसात करायला हवे. सरकारी नोकरी मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीचे नाव एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमधील यादीतून कमी होणे अपेक्षित आहे. आता नोकरी मिळाल्यानंतर संबंधितांचे नाव आपोआप कमी होईल अशी यंत्रणा उभारण्याचे काम सुरू आहे.

‘पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील नीती आयोगाची खिल्ली उडविल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन’

शाब्बास! गोव्यातील 1.10 लाख बेरोजगारांच्या अहवालावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नीती आयोगाची खिल्ली उडविल्याबद्दल भाजप सरकारचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे अभिनंदन. डॉ. प्रमोद सावंत यांनी यापूर्वी 102 टक्के कोविड लसीकरण सिद्धांताचा शोध लावला होता, अशी बोचरी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa Government Development Exhibition
Goa Temple Tourism
home minister amit shah reviews goa st reservation file
 Pramod Sawant Delhi Meeting
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com