Damodar Mauzo: गोमंतकीय परंपरा, संस्कृतीचे जतन करा

Damodar Mauzo: हेरिटेज फेस्टीव्हलचे उद्‍घाटन, ‘परमल’चे प्रकाशन
Damodar Mauzo | Goa News
Damodar Mauzo | Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

Damodar Mauzo: गोव्याची अस्मिता राखून ठेवण्याची गरज असून हेरिटेज फेस्टीव्हलसारख्या कार्यक्रमांना प्रोत्साहन देण्याची आवश्‍यकता आहे. आपली अस्मिता महत्त्वाची आहे, त्याच बरोबर गोमंतकीय परंपरा आणि संस्कृती जपण्याची आवश्‍यकता आहे.

हेरिटेज फेस्टीव्हलच्या आयोजकांचे आभार मानले पाहिजे, कारण गोव्याचा वारसा त्यांना सगळ्यासमोर आणला आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिक दामोदर मावजो यांनी व्यक्त केले.

पणजी येथे हेरिटेज फेस्टीव्हलच्या उद्‍घाटन सोहळ्यात मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. पाच दिवस चाललेल्या अग्रगण्य गोवा हेरिटेज फेस्टिव्हलची आज राज्याच्या राजधानी पणजी येथे सुरुवात झाली.

यावेळी ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त दामोदर मावजो, गोवा हेरिटेज ॲक्शन ग्रुपचे अध्यक्ष डॉ. जार्सन फर्नांडिस, सहभागी कलाकार आणि लेखक लेला तयाबजी आणि गोवा हेरिटेज असोसिएशन कार्लोस डिसोझा, हेता पंडित, पृथा सरदेसाई उपस्थित होते.

Damodar Mauzo | Goa News
Goa News: इमारत पाडण्यासाठी अखेर महापालिकेला सापडला मुहूर्त

संस्था भारतातील सर्वात लहान राज्याच्या समृध्द आणि वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसा साजरा करतो. पुढील आठवड्यात सकाळच्या ते सूर्यास्तापर्यंत संपूर्ण कुटुंबासाठी हेरिटेज वॉक, चर्चा, संगीत, नृत्य, आणि कविता, अन्न आणि पेये यांचा समावेश असेल गोवा हेरिटेज, ॲक्शन ग्रुपने कार्यक्रमात ‘परमल’ या वार्षिक अंकाचे प्रकाशन केले. हा सर्जनशील लेखक जोस लोरेंको आणि रुक्मिणी यांनी संपादित केला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com