Central Government Funds  | Goa News
Central Government Funds | Goa News Dainik Gomantak

Goa News: आर्थिक चणचणीत 450 कोटींचा आधार

Goa News: केंद्र सरकारचा निधी : करापोटीच्या रक्कमेचा विकासासाठी विनियोग
Published on

Goa News: अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र सरकारने निधीतून करापोटी द्यावयाची रक्कम म्हणून गोव्यासह सर्व राज्यांना 1,16,665 कोटी रुपयांची रक्कम मंजूर केली आहे. यातील 450 कोटी गोव्याला मिळणार आहेत. हा निधी राज्याच्या विविध विकासकामांसाठी वापरला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, ‘राज्यभरात सध्या अनेक विकासकामे सुरू आहेत. शिवाय काही कामे प्रस्तावित आहेत. त्या अनुषंगाने केंद्र सरकारने दिलेला हा निधी महत्त्वाचा आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा आभारी आहे. या निधीतून राज्यासाठी महत्त्वाची असलेली विकासकामे केली जातील.’

Central Government Funds  | Goa News
Rohan Khaunte: प्रस्तावित जेटी धोरणाचा मुद्दा मुख्यमंत्र्यांच्या दरबारी!

राज्यासाठी महत्त्वपूर्ण बाब

कोरोना काळात पर्यटनाबरोबर इतर व्यवसाय मंदावले होते. त्यातच खाण व्यवसाय देखील बंद आहे. यामुळे जीएसटी व एकूण महसुलात मोठी घट झाली होती. याचा परिणाम विकासकामांवरही झाल. तसेच जुलैपासून जीएसटी परतावा बंद झाला आहे. आता केंद्र देत असलेल्या निधीमुळे राज्यातील रस्ते, पूल, इमारती इतर साधनसुविधा उभारण्यासाठी मोठी मदत मिळेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com