अवयवांच्या प्रतीक्षेत गोव्यात 10 तर, देशात 5 वर्षांत 2805 रुग्णांचा मृत्यू, किडनीसाठी राज्यात 97 रुग्ण वेटींगवर; मन हेलावणारी आकडेवारी!

Goa Organ Transplant Waitlist: अवयव प्रत्‍यारोपणाच्‍या प्रतीक्षेत असलेल्‍या राज्‍यातील दहा रुग्‍णांचा पाच वर्षांत मृत्‍यू झाला आहे.
Organ Transplant Waitlist
Organ Transplant Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: अवयव प्रत्‍यारोपणाच्‍या प्रतीक्षेत असलेल्‍या राज्‍यातील दहा रुग्‍णांचा पाच वर्षांत मृत्‍यू झाला आहे. तर, सद्यस्‍थितीत किडनीच्‍या प्रतीक्षेत ९७ रुग्‍ण असल्‍याची माहिती केंद्रीय आरोग्‍य राज्‍यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्‍यसभेतील लेखी प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून दिली आहे.

गेल्‍या पाच वर्षांत अवयव प्रत्‍यारोपणाच्‍या प्रतीक्षेत असलेल्‍या किती रुग्‍णांचा मृत्‍यू झाला? देशभरात किडनी, यकृत, हृदय, फुफ्फुस आणि स्वादुपिंड या अवयवांच्‍या प्रतीक्षेत एकूण किती रुग्‍ण आहेत? असे लेखी प्रश्‍‍न राज्‍यसभा खासदार स्‍वाती मलिवाल यांनी विचारले होते. या प्रश्‍‍नाला दिलेल्‍या उत्तरांमध्‍ये मंत्री जाधव यांनी जी आकडेवारी सादर केलेली आहे, त्‍यानुसार अवयवांच्‍या प्रतीक्षेत असलेल्‍या २,८०५ रुग्‍णांचा गेल्‍या पाच वर्षांत मृत्‍यू झाला. त्‍यात गोव्‍यातील दहा रुग्‍णांचा (Patient) समावेश असल्‍याचे दिसून येते.

दुसरीकडे, देशभरात देशातील सर्वच राज्‍यांमध्‍ये ८२,२८५ रुग्‍ण किडनी, यकृत, हृदय, फुफ्फुस आणि स्वादुपिंड या अवयवांच्‍या प्रतीक्षेत असून, राज्‍यात ९७ रुग्‍ण किडनीच्‍या प्रतीक्षेत असल्‍याचे आणि २०२० ते २०२४ या पाच वर्षांच्‍या काळात राज्‍यात किडनी प्रत्‍यारोपणाच्‍या ३१ शस्‍त्रक्रिया यशस्‍वी झाल्‍याचेही ही आकडेवारी सांगते.

Organ Transplant Waitlist
CM Pramod Sawant: 'हे पद लोकांच्या कल्याणासाठी, मी लोकांचा मुख्यसेवक'! मुख्यमंत्री सावंतांचे प्रतिपादन; Viral Video

दरम्‍यान, ‘सोटो’ ही संघटना गोव्‍यासह (Goa) देशभरात अवयव प्रत्‍यारोपणाबाबत जागृती करीत आहे. याशिवाय सोशल मीडियाच्‍या विविध माध्‍यमांद्वारेही अवयवदानासंदर्भातील माहिती जनतेला देण्‍यात येत असून, त्‍यासंदर्भात १८००११४७७० हा क्रमांक असलेले कॉल सेंटर २४ तास कार्यरत आहे. गोव्‍यात कार्यरत असलेल्‍या सोटो संघटनेला गेल्‍या सहा वर्षांच्‍या काळात केंद्र सरकारकडून ५९.७० लाख रुपयांचे अर्थसहाय्‍यही पुरवण्‍यात आलेले आहे, असेही मंत्री जाधव यांनी उत्तरात नमूद केले आहे.

Organ Transplant Waitlist
CM Pramod Sawant: नोकरीसाठी पहिली संधी अनाथ मुलांना, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मोठी घोषणा

१८ जणांवर कॉर्नियल प्रत्‍यारोपणाच्‍या शस्‍त्रक्रिया

२०२०–२१ ते २०२४–२५ या पाच वर्षांच्‍या काळात गोव्‍यासह देशभरात १,३७,७६१ जणांवर कॉर्नियल प्रत्‍यारोपणाच्‍या शस्‍त्रक्रिया यशस्‍वी झाल्‍या. त्‍यात गोव्‍यातील १८ जणांचा समावेश असल्‍याचेही मंत्री प्रतापराव जाधव यांनी यासंदर्भात विचारण्‍यात आलेल्‍या प्रश्‍‍नाच्‍या उत्तरातून स्‍पष्‍ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com