Vishwajit rane
Vishwajit rane Dainik Gomantak

Goa Medical College: अवयवदानासाठी फक्त 950 नोंदणी मात्र अजूनही 'एवढे' रुग्ण प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत - राणे

45 रुग्ण प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत ः आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांची माहिती

Goa Assembly Monsoon Session गोमेकॉ इस्पितळात सोटो विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागामार्फत अवयवदानासाठी नोंदणी केलेल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अवयव काढून ते इतरांना वापरण्यात येतात.

राज्यात सध्या ९५० लोकांनी अवयवदानासाठी नोंदणी केली आहे. त्यांच्या मृत्यूनंतर अवयव काढण्यासाठी परवानगी दिलेली आहे. अवयव दान हे श्रेष्ठ दान अशी जनजागृती करण्यात येत असली तरी ही नोंदणीची संख्या खूपच कमी आहे. अजूनही लोक अवयव दान नोंदणीसाठी पुढे येत नाहीत. राज्यात ४५ रुग्ण अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्यात गेल्या पाच वर्षांत किती अवयव प्रत्यारोपण करण्यात आले आहेत, यासंदर्भातचा अतारांकित प्रश्‍न विधानसभेत विचारला होता. त्याला लेखी उत्तर आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांनी दिले आहे.

Vishwajit rane
Goa Mine: ...तोपर्यंत कावरेत खाणींना परवाने नाहीत, सरकारतर्फे ग्रामस्थांना हमी

मूत्रपिंड अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया गोमेकॉ इस्पितळात करण्यात येते. मूत्रपिंड व कोर्निया (डोळ्याचा एक अवयव) प्रत्यारोपण जुने गोवे येथील हेल्थवे इस्पितळात करण्यात येते. दोनापावला येथील मणिपाल इस्पितळात मूत्रपिंड तर एएसजी इस्पितळात कोर्नियाचे प्रत्यारोपण करण्याची सुविधा उपलब्ध आहे.

२०१८ ते आत्तापर्यंत एकूण २९ मूत्रपिंड रोपणाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. त्यापैकी २३ शस्रक्रिया हयात असलेल्या व्यक्तीने दान केलेल्या आहेत, तर ६ शस्रक्रिया मृत व्यक्तीचे मूत्रपिंड काढून करण्यात आलेल्या आहेत.

या ६ प्रकरणातील शस्त्रक्रिया गोवा वैद्यकीय महाविद्यालयात करण्यात आल्या आहेत, अशी लेखी माहिती मंत्री राणे यांनी दिली आहे. कोर्निया रोपण गोव्यात एप्रिल २०२२ मध्ये सुरू करण्यात आले आहे.

Vishwajit rane
Goa Ration: नागरी पुरवठा खात्याने घेतला सडक्या तांदळाचा धसका; मडगाव, दवर्लीतील छापे

आत्तापर्यंत ९ कोर्निया अवयवांचे प्रत्यारोपण झाले असून त्यातील ७ शस्रक्रिया एएसजी इस्पितळात, तर २ हेल्थवे इस्पितळात करण्यात आलेल्या आहेत.

२०१८ ते जूनपर्यंत गोमेकॉ इस्पितळात मूत्रपिंड अवयव प्रत्यारोपणाच्या १३ शस्रक्रिया करण्यात आल्या आहेत, तर हेल्थवे इस्पितळात १४, मणिपाल इस्पितळात २ शस्रक्रिया करण्यात आल्या आहेत.

मूत्रपिंड अवयवासाठी ४४ जण प्रतीक्षेत आहेत. त्यामध्ये सर्वाधिक १० जण सालसेत तालुक्यातील आहेत. त्यापाठोपाठ बार्देशमध्ये व तिसवाडीमध्ये प्रत्येकी ९ जणांचा समावेश आहे. पेडणे, धारबांदोडा, सांगे या तीन तालुक्यातून एकाही व्यक्तीने मूत्रपिंड अवयव प्रत्यारोपणासाठी अर्ज केलेला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com