Goa News : आपल्याला पराभूत करू शकते ती केवळ जनताच! श्रीपाद नाईक

Goa News : काँग्रेसचा उमेदवार नाही; ॲड. खलप यांना टोला
Goa
Goa Dainik Gomantak

Goa News :

पणजी, आपल्याला पराभूत करू शकते ती जनता. काँग्रेसचा उमेदवार नव्हे. आपण १९९९ मध्ये ॲड. रमाकांत खलप यांना ३८ हजार मतांच्या फरकाने पराभूत केले होते. त्यावेळी ते केंद्रात मंत्री होते, त्यांच्या मागे सरकारची ताकद होती.

आपणास पराभूत करण्याची तेव्हा त्यांना संधी होती, सध्या तशी स्थिती नाही, असे श्रीपाद नाईक म्हणाले.

त्यावेळी आपण नवीन उमेदवार होतो, आपण त्यांना पराभूत केले असे म्हणणार नाही, पण त्यांना जनतेने पराभूत केले होते, असे उत्तर गोवा खासदार तथा उमेदवार श्रीपाद नाईक यांनी ॲड. खलप यांच्या दाव्याला प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेसची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आपण भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांना पराभूत करू शकतो, असे ॲड. खलप यांनी काँग्रेस भवनात सांगितले होते. त्यामुळे यावर श्रीपाद भाऊंनी अत्यंत खुबीने ॲड. खलप यांच्या गुगलीला प्रत्युत्तर दिले आहे. पराभूत करण्याची आणि निवडून देण्याची ताकद सध्या केवळ जनतेच्या हातात आहे, हे ओळखूनच नाईक यांनी आपले मत व्यक्त केले आहे.

श्रीपाद नाईक यांनी सकाळी पणजीतील प्रसिद्ध कॅफे भोसले येथे नाश्ता केला. बोक दी व्हॉक झर येथील साईबाबा मंदिरात आरती करून आशीर्वाद घेत प्रचाराला सुरवात केली. त्यानंतर त्यांनी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला. मारुतीगडावर जाऊन त्यांनी मारुतीरायाचे दर्शन घेतले. त्यानंतर युवा कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. सांतिनेज येथील श्री वाठारेश्वर देवस्थानात दर्शन घेतल्यानंतर मुस्लीमवाड्यावर भेट देऊन मुस्लीम बांधवांशी संवाद साधला.

२५ वर्षांचा लेखाजोखा देणार

श्रीपाद नाईक यांनी रविवारी पणजीत आपला प्रचार दौरा केला. बोक दी व्हॉक येथील झरीजवळ जमलेल्या नागरिकांशी संवाद साधून झाल्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्‍नावर ते बोलत होते. आपल्या काळात मोपा आणि आयुष हॉस्पिटल आम्ही आणले.

२५ वर्षांत आपण काय केले? याचा सर्व अहवाल मतदारांच्या हाती आठवडाभरात आपण ठेवणार आहोत. राज्याला २४ तास विमानतळ हवे होते, ते आम्ही आणून दिले. ३०५ कोटींचे आयुष हॉस्पिटल आम्ही धारगळला उभारले, तेथे दररोज पाचशेच्यावर लोक दररोज ओपीडीमध्ये जातात. मुरगाव जेटीवर दोन बर्थचा समावेश केला आहे. क्रूझ बोटी येण्यासाठी ते महत्त्वाचे होते. राष्ट्रीय महामार्गाचे काम करण्यात आले आहे.

सात ते आठ वर्षांत केंद्र सरकारने दिलेल्या ३५ हजार कोटींच्या निधीतून विकास साधण्यात आलेला आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी १६२ कोटींची निधी दिला आहे, त्याशिवाय कॅन्सर वॉर्डसाठी ८ कोटींचा निधी दिला आहे. खासदार निधीतून १२०० प्रकल्प घेतले होते, त्यातील ११०० प्रकल्प मंजूर झालेले आहेत, असे सांगत खासदार नाईक यांनी विविध विकासकामांची यादीच मांडली.

Goa
Goa AAP: का झाला कुजिरातील मुलांत वाद? आम आदमी पक्षाने सांगितले कारण

भाजपात नसतानाही बाबूशची मदत

आमदार बाबूश मोन्सेरात हे सध्या भाजपात मंत्री आहेत, परंतु यापूर्वी लोकसभा निवडणुकीच्यावेळी बाबूश यांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आपणास मदत केलेली आहे, ते आपण कधीच विसरू शकत नाही. गेल्या सलग पाच निवडणुकांत आपल्यासारख्या लहान कार्यकर्त्यास मोठ्या मताधिक्क्यांनी निवडून दिले आहे.

पणजीचा आणि गोव्याचा विकास दिसत आहे, त्यात सर्वांचा वाटा आहे. युवा आणि महिला शक्तीचा उपयोग करून देशाची प्रगती साधण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. कार्यकर्ते ही पक्षाची ताकद आहे, ते पक्षाचे किंवा नेत्याचे काम करीत नाहीत, तर ते देशासाठी काम करतात, असेही नाईक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com