Fake Traffic Challan Scam: बनावट वाहतूक चलनातून ऑनलाइन फसवणूक; तामिळनाडूतून संशयिताला अटक

Goa Online Fraud Case: ऑनलाइन फसवणूकप्रकरणी डिचोली पोलिसांनी तामिळनाडू येथून एका संशयिताला अटक केली आहे.
Goa Online Fraud Case
Fake Traffic Challan ScamDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

डिचोली: ऑनलाइन फसवणूकप्रकरणी डिचोली पोलिसांनी तामिळनाडू येथून एका संशयिताला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

डिचोली पोलिसांच्या पथकाने तामिळनाडूत जाऊन ही कारवाई केली. बुधवारी सकाळी संशयिताला डिचोली पोलिस स्थानकात आणल्यानंतर रीतसर अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी मंजूर करण्यात आली.

Goa Online Fraud Case
Goa Politics: निवडणुकीची तारीख जाहीर होताच मगो 'पत्ते' उघडणार! युती, जागावाटपाचा निर्णय संसदीय समितीकडे

संशयिताचे नाव अद्याप समोर आलेले नाही. बनावट वाहतूक चलन पाठवून डिचोलीतील काही नागरिकांची ऑनलाइन फसवणूक झाल्याचे प्रकार घडले आहेत. या प्रकरणांत संशयिताचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली डिचोली पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com