October Heat: गोव्यात 'ऑक्टोबर हिट'चा तडाखा! तापमान 36.3 अंशांवर; पुढील दोन दिवस उष्णता वाढणार

Goa October Heat Update: राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवू लागला आहे. सोमवारी राज्यात कमाल ३६.३ अंश, तर किमान २४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Goa October Heat Update
October HeatDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: राज्यात ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवू लागला आहे. सोमवारी राज्यात कमाल ३६.३ अंश, तर किमान २४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. विशेष म्हणजे, कमाल तापमान सामान्य पातळीपेक्षा तब्बल ४.८ अंशांनी अधिक नोंदविण्यात आले.

पुढील दोन दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वेधशाळेने वर्तविली आहे. पावसाने घेतलेली उघडीप आणि वाढते तापमान यामुळे नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन वेधशाळेने केले आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर वेधशाळेने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

Goa October Heat Update
BL Santhosh Goa Visit: सलग चौथ्यांदा सत्तेत येण्यासाठी भाजपचा गोव्यात मास्टरप्लॅन; राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष यांच्या दोन दिवसांचा दौरा!

शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ नये, यासाठी तहान लागली नसली तरी ठरावीक अंतराने पुरेसे पाणी प्यावे. कामगारांनी कडक उन्हात थेट सूर्यप्रकाशात काम करणे टाळावे. मद्य, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड शीतपेयांचे सेवन टाळावे. तसेच उच्च प्रथिने असलेले आणि शिळे अन्न खाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com