Nursing College: 'मुख्यमंत्री आणि माझ्यामध्ये पूर्ण समन्वय'! नर्सिंग कॉलेजच्या चर्चांवरती राणेंनी दिले उत्तर

Vishwajit Rane: आम्ही केवळ राज्याच्या विकासासाठीच नव्हे, तर लोकांच्या हितासाठी देखील कटिबद्ध आहोत, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले.
Vishwajit Rane
Vishwajit Rane Dainik Gomantak
Published on
Updated on

Vishwajit Rane on new nursing college in Goa

पणजी: गोव्यात नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचा आपला दृढ निश्चय असून या निर्णयामध्ये सर्व भागीदारांना विश्वासात घेतले जाईल, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केले आहे. सर्व भागीदारांना विश्वासात घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेतला जाणार नाही.

आम्ही केवळ राज्याच्या विकासासाठीच नव्हे, तर लोकांच्या हितासाठी देखील कटिबद्ध आहोत, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी सांगितले. या महत्त्वाच्या निर्णयासाठी सर्व स्तरावर चर्चा आणि सल्लामसलत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राय-कुडतरी येथील तेरेझा स्कूलमध्ये गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या सहकार्याने आयोजित मेगा आरोग्य शिबिरात आरोग्यमंत्र्यांनी खास भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. आरोग्यमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री आणि माझ्यामध्ये पूर्ण समन्वय आहे.

Vishwajit Rane
Mapusa Hospital: आरोग्‍यमंत्री राणेंचा रुद्रावतार! तिघे निलंबित, डॉक्टरांना ‘डोस’

आम्ही दोघेही लोकांच्या सर्वोत्तम हिताचा विचार करू. मला नर्सिंग कॉलेज हवे आहे आणि स्थानिक गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी जास्तीत जास्त प्रवेश क्षमता उपलब्ध व्हावी, अशी माझी इच्छा आहे. मी काही एकटा निर्णय घेणार नाही. सर्व संबंधित भागीदारांना विश्वासात घेऊनच जे योग्य वाटेल तेच अंतिम निर्णय म्हणून स्वीकारले जाईल.

Vishwajit Rane
Vishwajit Rane: दिगंबर कामतांशी भांडून घेतलं आरोग्य खातं, कारण...! विश्वजीत राणेंनी सांगितले कारण

‘स्थानिक विद्यार्थ्यांना मिळणार संधी’

सर्वांच्या हिताचा विचार करूनच आम्ही पुढे पावले टाकणार आहोत. लोकांचे कल्याण आणि राज्याचा विकास या दोन्ही गोष्टींचा समतोल साधतच निर्णय घेतला जाईल. गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी अधिक शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यावर आम्ही भर दिला आहे. नर्सिंग क्षेत्रात स्थानिक विद्यार्थ्यांना अधिक जागा मिळाव्यात यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com