High Security Registration Plate: 2019 पूर्वी वाहन खरेदी केलंय? मग तुम्हालाही बदलावी लागणार नंबरप्लेट; गोव्यात मोजावे लागतील 'एवढे' पैसे

Goa Vehicle Number Plate Update: देशातील 2019 पूर्वीच्या वाहनांच्या नंबरप्लेट सुरक्षेच्या कारणास्तव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोव्यात दुचाकीच्या नंबरप्लेटसाठी 155 रुपये आकारले जात आहेत.
Goa Vehicle Number Plate Update
High Security Registration PlateDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Number Plate Replacement Fees for Pre 2019 Vehicles Announced

पणजी: देशातील 2019 पूर्वीच्या वाहनांच्या नंबरप्लेट सुरक्षेच्या कारणास्तव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गोव्यासह महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश आणि झारखंड या राज्यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता राज्यातील ज्या वाहनधारकांच्या वाहनांच्या नंबरप्लेट 2019 पूर्वीच्या आहेत त्यांना त्या बदलाव्या लागतील.

नंबरप्लेट बदलण्यासाठी पैसे द्यावे लागणार

दरम्यान, नंबरप्लेट बदलण्यासाठी वाहनधारकांना पैसे मोजावे लागणार आहेत. नंबरप्लेट बदलण्याच्या माध्यमातून कोट्यवधींची लूट करण्याचा सरकारचा डाव असल्याचे बोलले जात आहे. दुचाकी, चारचाकी आणि अवजड वाहनांच्या नंबरप्लेटसाठी ठराविक रक्कम आकारण्यात येत आहे. इतर राज्यांच्या तुलनेत गोव्यात नंबरप्लेट बदलण्यासाठी कमी पैसे आकारले जात असले तरीही सरकारने ही लूट चालवल्याचा आरोप केला जात आहे.

Goa Vehicle Number Plate Update
Goa Accident: फर्नांडिस कुटुंबाला न्याय द्या! कार दुर्घटनेतील मृत्यूमुळे परिवारावर आर्थिक संकट; तपासात ढिलाई होत असल्याचा दावा

दुचाकी नंबरप्लेटसाठी किती रक्कम?

गोव्यात (Goa) दुचाकीच्या नंबरप्लेटसाठी 155 रुपये आकारले जात आहेत. तर इतर राज्यांच्या विचार केल्यास महाराष्ट्रात 450 रुपये, गुजरातमध्ये 160 रुपये, आंध्र प्रदेशात 245 रुपये तर झारखंडमध्ये 300 रुपये आकारले जात आहेत.

चारचाकी नंबरप्लेटसाठी किती रक्कम?

तसेच, चारचाकी वाहनांच्या नंबरप्लेटसाठी गोव्यात 203 रुपये आकारले जात आहेत. तर महाराष्ट्रात 745 रुपये, गुजरात 460 रुपये, झारखंड, 540 रुपये तर आंध्र प्रदेशात 619 रुपये नंबरप्लेटसाठी आकारले जात आहेत.

Goa Vehicle Number Plate Update
Goa Crime: पर्यटकांना हेरून मौल्यवान वस्तू चोरायचा, कॅसिनोत जाऊन उधळायचा! हॉटेल चोरी प्रकरणातील कासीमचे कारनामे उघड

अवजड वाहनांच्या नंबरप्लेटसाठी किती रक्कम?

याशिवाय, अवजड वाहनांच्या नंबरप्लेटसाठी गोव्यात 232 रुपये आकारले जात आहेत. तर महाराष्ट्रात 475 रुपये, गुजरातमध्ये 480 रुपये, झारखंड 570 रुपये तर आंध्र प्रदेशात 649 रुपये आकारले जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com