Deputy Chief Minister Babu Azgavkar
Deputy Chief Minister Babu Azgavkar

Goa: पेडणेत एकही बेरोजगार युवक उरणार नाही ; उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर

असा दावा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Azgavkar) यांनी रविवारी इब्रामपूर येथील श्री सातेरी मंदिर परिसराचा कामाचा शुभारंभ करताना केला.
Published on

येणारी विधानसभेची निवडणूक (Assembly Elections) ही बेरोजगारीचा प्रश्न सोडवणारी असणार आहे. जे विविध प्रकल्प होवू घातले आहेत त्यातून जी रोजगाराची निर्मिती होणार आहे त्या सर्व नोकऱ्या पेडणे मतदार संघातील युवकांना मिळणार आहे आणि निवडणुका झाल्यानंतर मतदार संघातील एकही युवक बेरोजगार उरणार नाही असा दावा उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Babu Azgavkar) यांनी रविवारी इब्रामपूर येथील श्री सातेरी मंदिर परिसराचा कामाचा शुभारंभ करताना केला .

गोवा पर्यटन विकास महामंडळ मार्फत या मंदिर परिसराचा एक कोटी १० लाख रुपये खर्च करून सुशोभीकरण करण्यात येत आहे , यावेळी तोरसे जिल्हा पंचायत सदस्य सीमा खडपे , धारगळ जिल्हा पंचायत सदस्य मनोहर धारगळकर ,इब्रामपूर सरपंच सोनाली इब्रामपूर ,माजी सरपंच सोनाली पवार , चांदेल सरपंच संतोष मळीक , भाजपा मंडळ अध्यक्ष तुळसीदास गावस , वारखंड सरपंच संजय तुळसकर ,झीलु हळर्णकर , मुख्याध्यापक सुभाष सावंत ,देवस्थान अध्यक्ष श्री गावस ,अभियंते नारायण मयेकर , जेष्ठ नागरिक आदी उपस्थित होते.

 Deputy Chief Minister Babu Azgavkar
Goa Tourism: राज्यातील जागतिक वारसास्थळावर होतेय अतिक्रमण

मंदिरे समाज प्रबोधन करणारी

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पुढे बोलताना मंदिरे हि समाज प्रबोधन करणारी सर्व धर्म सर्व समाजाला एकत्रित आणणारी आहे , त्यामुळे एकट्याच्या पैशातून हे मंदिर उभे होत नाही त्याला चारचौघांचा हात लागावा लागतो ,त्याच पद्धतीने सरकार मंदिराना सहकार्य करून विकास करतो असे ते म्हणाले.

झोपडीला पत्रे घातले म्हणून घर होत नाही

निवडणुका जवळ आल्या कि पावसात जशी अळंबी उगवतात त्याच पद्धतीने काहीजण निवडणुका जवळ आल्या कि एकाध्या नागरिकांच्या झोपडीला दोन चार पत्रे घालून देतो आणि आपण त्याला घर बांधून दिले अशी प्रसिद्धी मिळवतो , अश्या खोटी माहिती पुरवणाऱ्या नेत्यांचा जनतेने समाचार घ्यावा , त्याना जाब विचारावी असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी केले.

 Deputy Chief Minister Babu Azgavkar
Goa: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा दुसऱ्यांदा नियोजित दौरा रद्द !

चार पोटले वाढले म्हणून नेता होत नाही

निवडणुका जवळ आल्या कि काही जण एक दोन घरात चार पोटल्या वाटतात आणि आपले फोटो पेपरमध्ये छापून आंणतात त्या नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे कि कोरोना काळात पेडणे मतदार संघात तब्बल साडे आठ हजार कुटुंबियाना मोफत सरकारने कडधान्य रेशन वितरीत केले त्याचे कुणी फोटो छापून आणले नाहीत असा प्रश्न उपस्थित केला. पेडणे तालुक्याक़्त होवू घातलेल्या प्रकल्पातून पेडणे मतदार संघातील नागरिकाना रोजगारांच्या संधी मिळणार आहे.

 Deputy Chief Minister Babu Azgavkar
Goa: मुरगाव नगरपालिका क्षेत्रात दूषित पाण्याचे साम्राज्य !

1999 पासून आमदार

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी बोलताना आपण धारगळ मतदार संघाचा १९९९ साली आमदार झालो त्यावेळी आपण कुणालाच आश्वासन दिले नव्हते ,आपल्याला निवडून आणा आणि काम करून घ्या , त्या दिवसापासून आपण विकासाची गंगा या मतदार संघात आणली आहे असे सांगून परत एकदा उर्वरित कामे व बेरोजगारी संपवण्यासाठी निवडून देण्याचे आवाहन केले .

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com