Goa: निरंकालचे उपआरोग्य केंद्र अपुऱ्या जागेत

गवळवाडा-निरंकाल (Nirankal-Goa) येथे सुमारे ४५ वर्षांपासून भाड्याच्या घरात तुटपूंज्या जागेत उपआरोग्य केंद्र चालवले जात आहे.
Goa: Sub Health Center In Nirankal.
Goa: Sub Health Center In Nirankal.Dainik Gomantak
Published on
Updated on

शिरोडा : गवळवाडा-निरंकाल (Gavalwada, Nirankal-Goa) येथे सुमारे ४५ वर्षांपासून भाड्याच्या घरात तुटपूंज्या जागेत उपआरोग्य केंद्र (Sub Health Center) चालवले जात आहे. या उपआरोग्य केंद्रात होणारी गैरसोय लक्षात घेऊन त्यासाठी नवीन इमारत बांधावी, अशी मागणी या भागातील जागरूक नागरिक हेमंत सामंत यांनी केली आहे.

बेतोडा, निरंकाल, कोनशे, कोडार या गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुमारे ४५ वर्षांपासून गवळवाडा-निरंकाल येथील कौलारू भाड्याच्या घरात हे उपआरोग्य केंद्र चालवले जात आहे. एकाच लांब खोलीचे दोन भाग करून आठवड्यातून एकच दिवस डॉक्टर येऊन रुग्‍णांची तपासणी करतात. अन्य दिवशी लोकांना शिरोडा अथवा फोंडा आरोग्य केंद्रात जाऊन किंवा खासगी डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी लागत आहे. या भाड्याच्या घराच्या खोलीत रुग्णांना अथवा नागरिकांना बसायला पुरेशी जागाही नाही. दोन परिचारिका आणि एक मदतनीस अल्प जागेत कसेबसे काम करतात. आठवड्यातून फक्त बुधवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंतच डॉक्टर इथे उपलब्ध असतात. त्यामुळे कोडार, निरंकाल, कोनशे या भागातील जवळजवळ ३५०० पेक्षा जास्‍त लोकांची गैरसोय होते.

Goa: Sub Health Center In Nirankal.
Goa: कोरोना नियम पाळून शाळा सुरु करा; पालकांची मागणी

या आरोग्यकेंद्रात कायम स्वरूपी डॉक्टरची व्यवस्था नसल्याने लोकांना शिरोडा, फोंडा अथवा बांबोळीला गोमेकॉ इस्‍पितळात जाऊन उपचार घ्यावे लागतात. शासनाने सर्वप्रथम या उपआरोग्य केंद्रासाठी पक्‍क्या स्वरूपाची वास्तू बांधून या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी कायमस्वरूपी डॉक्टरची नेमणूक करावी, अशी मागणी हेमंत सामंत यांनी केली आहे.

Goa: Sub Health Center In Nirankal.
Goa: आपेव्हाळ-प्रियोळ येथे कदंब बसला अपघात

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com