पणजी: राज्यात कोरोना नियंत्रणात येत असल्याने गोवा सरकारने हळू हळू सर्वच गोष्टी खुल्या केल्या आहेत. फक्त शाळा- महाविद्यालये, कसिनो व थियेटर तेवढी बंद आहेत. नाही म्हणायला शाळा व माहविद्यालयात शिक्षक जात आहेत. तर विद्यार्थी घराच राहून ऑनलाईन पध्दतीने शिकत आहेत. मात्र बहुतांश भागात मोबाईल रेंजची समस्या असल्याने ऑनलाईन शिक्षणाचा लाभ सर्व विद्यार्थ्यांना मिळत नाही. त्यामुळे गेले दिड वर्षे घरात राहून कंटाळलेले व रेंजच्या समस्येने त्रासलेले विद्यार्थीही आता कोरोना नियम पाळून शाळा - महाविद्यालये सुरु करा. अशी मागणी करताना दिसत आहेत. (Parents demand to start school by following the Corona rules in goa)
सोशल मिडियातून ही मागणी जोर धरत आहे. किमान 9 वी च्या पुढील वर्गतरी सुरु करावेत, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकही करत आहेत. महाराष्ट्र सरकारने 15 ऑगस्टपासुन राज्यातील महाविद्यालये व हायस्कूल सुरु करणार असल्याचे यापुर्वीच जाहिर केलेले आहे. त्यामुळे आता गोव्यतही शाळा महाविद्यालये सुरु करा अशी मागणी जोर धरत आहे.
बसेस सुरु, मग शाळा बंद का?
राज्यात बसेस सुरु आहेत. बाजार व उद्योग सुरु आहेत. बसमध्ये व बाजारात गर्दी होते. कोरोना नियम पाळले जात नाहीत. कारवाई तर होतच नाही. गोव्यात कोरोना नियंत्रणात आहे, तर महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण जास्त वाढत आहेत. तेथे शाळा सुरु होणार आहेत. मग गोवा सरकार शाळा सुरु करण्यासाठी चालढकल का करत आहे ? मुलांना आॅनलाईन शिक्षण योग्य प्रकारे मिळत नाही. निदान यापुढेतरी कोरोनाचे नियम पाळून ८ वीच्या पुढील शाळा सुरु करा असे मत संतोष नाईक यांनी व्यक्त केले.
आम्ही बारावीच्या परिक्षा दिल्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेतला, मात्र वर्षभर महाविद्यालयात गेलोच नाही. शिक्षक, वर्गातील इतर विद्यार्थी यांना पाहिले नाही. निदान या वर्षीतरी महाविद्यालयात जाऊन वर्गीत शिकण्याची संधी मिळावी. आम्ही कोरोना नियमांचे पालन करण्यास तयार आहोत. सरकारने कोरोना नियामांचे पालन करुन महाविद्यालये सुरु करण्याची परवानगी द्यावी असेही मत पालकांनी व्यक्त केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.