Goa Nightclub Fire: क्लब मालकाकडून 25 लाख रुपयांचा हफ्ता पोहोचत होता, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांचा आरोप
म्हापसा: कळंगुटचे माजी आमदार आग्नेलो फर्नांडिस यांनी, हडफडे येथील अग्नितांडव प्रकरणी संतप्त व्यक्त केला. मुळात बर्च क्लब हा आगरमध्ये कार्यरत होता. याचाच अर्थ, या क्लब मालकाकडून २५ लाख रुपयांचा हफ्ता पोहचवला जायचा. परिणामी, भोगवटा प्रमाणपत्रविना हा क्लब कार्यरत होता, असा आरोप आग्नेलो यांनी केला.
बर्च क्लबकडे भोगवटा प्रमाणपत्र नव्हते. ते मिठागरात बांधले होते. परंतु, क्लब मालक हफ्ते देत असल्याने चालवण्याची परवानगी देण्यात आली. मात्र, ही लाच नेमकी कोणाला दिली जात होती, याचा उल्लेख माजी आमदार आग्नेलो यांनी केला नाही. आग्नेलो म्हणाले की, पंचायत संचालनालयाने बर्च क्लबला स्थगिती दिल्याने ही दुर्घटना घडली. त्यामुळे संचानालयाला जबाबदार धरलेपाहिजे.
अशा प्रकारच्या स्थगितींना वेळमर्यादा यापुढे ठरविली पाहिजे. हा क्लब बेकायदेशीरपणे कार्यरत होता. तरीही हा बिनदिक्तपणेसुरु होता. याचाच अर्थ कोणाला तरी हफ्ते जात होते, असा आरोप आग्नेलो यांनी केला.
ज्यांच्यामुळे हा क्लब कार्यरत होता, त्या सर्वांना जबाबदार धरावे. हफ्त्यामुळेच असे अनधिकृत क्लब चालतात, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

