Goa: ‘नाईट लाईफ’ ही गोव्याची संस्कृती नाही!

Bicholim Program: भजन, धालो, फुगडी ही गोमंतकीयांची संस्कृती आहे.
CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

Bicholim: नाईट लाईफ किंवा ड्रग्ज ही आमची संस्कृती नव्हे, तर भगवान परशुरामांची भूमी असलेल्या गोमंतभूमीला संस्कृतीचा समृद्ध वारसा आहे. भजन, धालो, फुगडी ही आपली संस्कृती आहे.

नाईट लाईफ, ड्रग्ज यासारख्या अनिष्ट प्रवृत्तींचा नायनाट करण्यासाठी सरकार गंभीर आहे, असे वक्तव्य मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कारापूर येथे केले. विठ्ठलापूर-कारापूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजित विद्यार्थी गौरव आणि मान्यवरांच्या सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. सावंत प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.

CM Pramod Sawant
Goa Pollution: मासळीच्या असह्य दुर्गंधीमुळे जनता त्रस्त

गुरुवारी रात्री हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट खास अतिथी या नात्याने उपस्थित होते. अन्य मान्यवरांमध्‍ये सरपंच दत्तप्रसाद खारकांडे, पंच सुकांती खारकांडे, लक्ष्मण गुरव, ज्ञानेश्वर बाले आणि दामोदर गुरव तसेच गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष विष्णू मेणकूरकर, सचिव नंदा सावळ, औदुंबर जोगळे, दीपक धावस्कर, सोमनाथ मोरजकर, केतन मयेकर, समीर वायंगणकर, दीपक मठकर आदी पदाधिकारी यांचा समावेश होता.

CM Pramod Sawant
Goa Politics| आपली बदनामी करणाऱ्यांना कवळेकरांची फूस; सुभाष फळदेसाई यांचा आरोप

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे ही केवळ गणपती पूजण्यापर्यंत मर्यादित राहिलेली नाहीत, तर मंडळांच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम पुढे येत आहेत. जे स्वप्न बाळगून लोकमान्य टिळक यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली. ते स्वप्न सत्यात उतरत असल्याचे दिसून येत आहे, असे मत प्रेमेंद्र शेट यांनी व्यक्त केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com