दुधसागर धबधब्यावर येणाऱ्या ट्रेकर्सकडून यंदापासून गोवा पर्यटन विकास महामंडळ (177 रुपये) आणि गोवा वन विकास महामंडळाने (50 रुपये) शूल्क आकारणीचा निर्णय घेतला आहे. हे शूल्क पर्यटक देणार आहेत.
गाईड्सचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. ह्या व्यवसायातील दलालांवर आळा यावा आणि पर्यटन सुरळीत व्हावे हाच उद्देश. कोणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. सावर्डेचे आमदार आणि जीटीडीसीचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकरांचा इशारा.
कोलकाता येथे महिला डॉक्टरवरील अत्याचारप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री स्वतः एक महिला असून हलगर्जीपणा दाखविल्याबद्दल गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून ममता बॅनर्जी यांचा निषेध.
इंडियन मेडिकल एसोसिएशनतर्फे मुख्यमंत्री सावंत यांची भेट घेऊन निवेदन सादर करून डॉक्टरांच्या सुरक्षिततेविषयी चर्चा.
म्हाऊस ग्रामपंचायतीचे सरपंच सोमनाथ काळे यांचा सरपंच पदाचा रजिनामा. अलिखित करारानुसार कार्यकाळ समाप्त. सुलभा देसाई यांची सरपंचपदी वर्णी लागण्याची शक्यता.
पणजीत GMC च्या शिकाऊ आणि रहिवासी डॉक्टरांनी रस्त्यावर उतरत कोलकता घटनेचा निषेध नोंदवला आहे. मूक मोर्चात मोठ्या प्रमाणावर डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय क्षेत्राशी संबधित नागरिकांनी सहभाग घेतला आहे.
म्हापसा नवीन केटीसी बस स्थानकाजवळ अमली पदार्थ (कोकेन) विक्री प्रकरणी युगांडाच्या दोघांना अटक. दोघांकडून 20 लाख 50 हजार किमतीचे 205 ग्रॅम कोकेन जप्त. म्हापसा पोलिसांची कारवाई.
कोलकता घटनेच्या निषेधार्थ आमदार डॉ. चंद्रकांत शेट्येंसह राज्यातील डॉक्टर, परिचारिका पणजीतील आझाद मैदानावर एकवटले आहेत. गोवा वैद्यकीय कायद्यात दुरुस्ती, जिल्हा कृती दलांची स्थापना करण्यासह रुग्णालयांना सुरक्षित ठिकाणे म्हणून जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दूधसागर धबधबा पर्यटनस्थळ येथे जाण्यासाठी जीटीडीसीचा दर अनाठायी असल्याने येथील वन खात्याने नेमणूक केलेल्या गाईड्समध्ये नाराजी. मागणी पूर्ण करत नाही तो पर्यंत पर्यटकांना ट्रेकींगसाठी घेऊन जाणार नसल्याची गाईड्सची भूमिका.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.