Old Goa News: गरम पाण्याच्या टबमध्ये पडून चिमुरडीचा मृत्यू

जुने गोवे येथील शांती निकेतन वसतिगृहात रविवारी संध्याकाळी 5.45 च्या सुमारास गरम पाणी भरलेल्या बाथटबमध्ये पडून 7 वर्षीय विशेष मुलगी गंभीर जखमी झाली होती.
Death |Goa News
Death |Goa NewsDainik Gomantak

Old Goa News: जुने गोवे येथील सेंट झेव्हियर इन्स्टिट्यूटच्या शांती निकेतन वसतिगृहात रविवारी संध्याकाळी 5.45 च्या सुमारास गरम पाणी भरलेल्या बाथटबमध्ये पडून 7 वर्षीय विशेष मुलगी गंभीर जखमी झाली होती. तिचा आज गोवा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

याप्रकरणी निष्काळजीपणाबद्दल वसतिगृहाच्या वॉर्डन व मदतनिस यांच्याविरुद्ध जुने गोवे पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

शांती निकेतन येथील वसतिगृहात विशेष मुलांचे संगोपन केले जाते. मूळ ओरिसाच्या ग्रेसी हिला मेरशी येथील ‘अपना घर’मध्ये जुलै 2022 पासून ठेवण्यात आले होते. मात्र, तिच्या शिक्षणासाठी तिला या वसतिगृहात हलवण्यात आले होते. रविवारी संध्याकाळी मुलांना आंघोळीसाठी टबमध्ये गरम पाणी तापण्यास ठेवण्यात आले होते.

Death |Goa News
Asian Games 2023 : सेलर कात्या कुएल्हो आशियाई स्पर्धेसाठी पात्र; पर्ल कोलवाळकर, डेन कुएल्हो यांना रौप्यपदक

हे पाणी गरम होत असताना 7 वर्षीय ग्रेसी ही ती त्या टबजवळ पोहचली व ती आतमध्ये पडली. याची माहिती उपस्थित असलेल्या वॉर्डन व मदतनिसांनाही समजली नाही. जेव्हा मदतनिस टबमध्ये पाणी गरम झाले का पाहण्यास आली असता ती गरम पाण्यामुळे होरपळली होती.

लगेच तिला रुग्णवाहिकेने गोमेकॉ इस्पितळात नेण्यात आले. मात्र, ती गंभीर जखमी झाल्याने आज तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचा मृतदेह सांज जुझे दी आरियल येथे राहत असलेल्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात आला.

पालकांना धक्का

ग्रेसी या मुलीचे पालक बिभुती नायक हे मूळचे ओरिसा येथील आहेत. तिचे वडील पदविका अभियंता असून सांझ जुझे दी आरियल येथील एका खासगी कंपनीत कामाला आहे. तिची आई गृहिणी आहे.

ग्रेसी ही मुलगी मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याने तिला मेरशी येथील ‘अपना घर’मध्ये ठेवली होते. तिची लहान बहीण 2 वर्षांची आहे. तिच्या या अपघाती मृत्यूमुळे आईवडिलांना धक्का बसला आहे.

Death |Goa News
Goa News: ‘त्या’ आमदारांना दिली सहा आठवड्यांची मुदत

निष्काळजीपणाचा ठपका

जुने गोवे पोलिसांनी वसतिगृहाच्या वॉर्डन रिटा फर्नांडिस (51, कळंगुट) व मिना डाबरे (48, महाराष्ट्र) यांना जबाबदार धरत त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी या विशेष मुलीवर नजर न ठेवल्याने ही घटना घडली.

त्यामुळे पोलिसांनी भादंसंच्या कलम 304-अ तसेच बाल कायद्याच्या कलम 8 खाली व ज्युवेनाईल जस्टिस कायद्याच्या कलम 75 व 85 खाली गुन्हे नोंद केले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com