Goa News: कार्यक्रम झाला, कचरा राहिला; जुन्या गोमेकॉच्या प्रवेशद्वारासमोर हा प्रकार केला कोणी?

Old GMC Goa: जुन्या गोमेकॉच्या प्रवेशद्वारात कचरा साठवून ठेवण्यात आल असल्याने या ऐतिहासिक वास्तूच्या प्रतिष्ठेला धक्का बसतोय
Garbage near Old GMC entrance Goa
Old GMC Panjim Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: सेरेंडिपिटी कला महोत्सव संपून आता सात दिवस झाले, पण त्या कार्यक्रमासाठी केलेल्या सजावटीचा कचरा अजूनही इतरत्र पडलेला दिसतोय. जुन्या गोमेकॉच्या प्रवेशद्वारात कचरा साठवून ठेवण्यात आल असल्याने या ऐतिहासिक वास्तूच्या प्रतिष्ठेला धक्का बसतोय. भाऊसाहेब बांदोडकर मार्गाला लागून असलेले जुने गोमेकॉ म्हणजेच आजचे मनोरंजन सोसायटीचे कार्यालय असून भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालन या इमारतीतून होते.

या इमारतीचा नुकताच आंतरराष्ट्रीय सेरेंडिपिटी कला महोत्सवासाठी वापर करण्यात आला होता. महोत्सवासाठी या परिसरात सजावट करण्यात आली होती आणि आता या महोत्सवाचा कचरा प्रवेशद्वारासमोर आणून टाकला आहे. इत्ररत्रवेळी या इमारतीच्या जवळ कचरा कुंड्या ठेवलेल्या असतात, पण सध्या या कुंड्या नजरेस पडत नाहीत.

Garbage near Old GMC entrance Goa
Serenity of Goa : आम्‍हाला शांत गोवा हवाय; संपादकीय

परंतु ज्यांनी कोणी हा कचरा मुख्य प्रवेशद्वारासमोर आणून टाकण्याचे कृत्य केले आहे, त्याबद्दल अनेकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. कदाचित रविवार असल्याने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी तो हटविला नसेल, पण अशाप्रकारे प्रवेशद्वारात कचरा कोणी आणून टाकला असेल? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. ऐतिहासिक वास्तूच्या प्रवेशद्वारासमोर कचरा नजरेस पडत असल्याने ही वास्तू अनेक दिवसांपासून बंद असावी काय, असे पाहणाऱ्यांना वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com