

फातोर्डा येथील अपहरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या नरसप्पा उर्फ नरसू या आरोपीला अल्पवयीन न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यानंतर त्याला कोलवाळ कारागृहात पाठवण्यात आले.
दक्षिण गोव्यातील बाणावली येथून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली. बाणावलीतील तळबंद येथे एका तलावात बुडून दीड वर्षाच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला.
राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा पंचायत निवडणुकीच्या मतमोजणीसाठी अधिसूचना (Notification) जारी केली. या घोषणेनुसार, राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 15 मतमोजणी केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
भारतीय नौदल आपले दुसरे ‘एमएच 60 आर’ हेलिकॉप्टर स्क्वाड्रन आयएनएएस 335 (ऑस्प्रे) येत्या 17 डिसेंबर रोजी आयएनएस हंसा, गोवा तळावर औपचारिकरीत्या कार्यान्वित करण्यात येणार आहे. या महत्त्वपूर्ण समारंभास नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के. त्रिपाठी उपस्थित राहणार आहेत.
बोगमाळो बीच रिसॉर्टमध्ये 12 लाख 73 हजार रुपयांची अफरातफर केल्याच्या आरोपाखाली रिसार्टच्या लेखा कर्मचारी प्रिती नाईक (मळा, पणजी) हिच्या विरुद्ध वास्को पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या आर्थिक अफरातफर प्रकरणी बोगमोळो बीच रिसॉर्टचे लेखा व्यवस्थापक नितीन पाटील यांनी वास्को पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली. लेखा कर्मचारी प्रिती नाईक हिने दोन महिन्यांपासून रिसॉर्टची लाखो रुपये आपल्या खात्यात वळवल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे. अनेक वेळा तिने हा फसवणुकीचा प्रकार केला आहे. दोन महिन्यांत तिने रिसोर्टचे पैसे आपल्या खात्यात वळवले असून ही रक्कम 12 लाख 72 हजार 835 रुपये एवढी आहे.
भोमावासीय बायपास रोड प्रोजेक्टला विरोध करत होते त्यावेळी प्रियोळचे आमदार गोविंद गावडे आमच्यासोबत उभे राहिले नाही किंवा आमच्या विरोधाला पाठबळ दिले नाही. आता जिल्हा पंचायत निवडणूक जवळ आली असून, गावडे या प्रकल्पाविरोधात बोलू लागते आहेत. याचा अर्थ हा विरोध केवळ आणि केवळ राजकीय फायद्यासाठी असल्याचे दिसते, असे भोमाचे स्थानिक संजय नाईक म्हणाले.
गोव्याला नाईट क्लब संस्कृतीची गरज नाही. राज्यातील बेकायदेशीर नाईट क्लब आणि डान्सबार बंद करण्याची वेळ आली आहे. पोर्तुगीज राजवट संस्कृती नष्ट करण्याच्या प्रयत्नात आपण थायलंडची संस्कृती आत्मसात करु नये, असे भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज म्हणाले.
कुठ्ठाळी उड्डाणपुलावर दुचाकीचा भीषण अपघात झाला. यात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला आहे. रविवारी पहाटे दीडच्या सुमारास हा अपघात झाला. के. एच. ब्रिक्रम सिंघा आणि पारितन सिंघा असे या अपघातात मृत झालेल्या दोघांची नावे आहेत. दोघेही मूळ आसामचे रहिवासी होते. पणजीतून वेर्णाच्या दिशेने जाताना दुभाजकाला धडकून त्यांचा अपघात झाला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.