
म्हापसा येथे मन्सूर एन्टरप्रायझेससमोर एक अपघात झाला. येथे गोवा पोलिसांच्या वाहनाची एका कारला धडक बसली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, धडक इतकी जोरदार होती की, कारचे नुकसान झाले. हा अपघात झाल्यानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली, पण अपघातग्रस्त वाहने तात्काळ रस्त्यावरुन बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
भारतीय हवामान विभागाने (IMD), गोवा यांनी आज (9 ऑक्टोबर 2025) दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी 'NOWCAST' हवामान इशारा जारी केला. यानुसार, गोव्याच्या अनेक भागांमध्ये पुढील काही तास वातावरण बदलणार आहे. विजांचा कडकडाट आणि गडगडाटासह हलका ते मध्यम पावसाची दाट शक्यता आहे.
मोरजी येथील श्री देवी मोरजाई मंदिराच्या व्यवस्थापन वादाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अत्यंत कठोर भूमिका घेतली. मंदिराच्या माजी व्यवस्थापनाला 13 ऑक्टोबरपर्यंत सर्व चेकबुक, रोकड (Cash) आणि महत्त्वाचे रेकॉर्ड्स नव्या समितीकडे सुपूर्द करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत.
साकोर्डा सरपंच व पंच सदस्यांची बैठक चालू असताना साकोर्डा सचिव बैठकीतून फाईल घेऊन निघाला. पंच सदस्यामध्ये नाराजी.
गांजा बाळगल्याप्रकरणी मडगाव पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. रात्रीच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत २.७७ लाख रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला असून, एनडीपीएस कायद्यांतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
साखळी नगरपालिकेच्यासौरऊर्जा प्रकल्पाचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते उदघाटन. या प्रकल्पातून नगरपालिकेला मिळणार ३० केव्ही वीज. उर्वरीत वीज देणार ग्रीडला. साखळी नगरपालिकेची प्रेरणा इतरही नगरपालिका व पंचायतींनी घ्यावी - मुख्यमंत्री डॉ. सावंत.
गोव्यात आजपासून आंतरराष्ट्रीय पर्पल फेस्ट सुरु होणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता या महोत्सवाचे उद्धाटन होणार आहे.
पर्ये – सत्तरी येथील सरकारी शाळेत क्लास सुरु असताना विद्यार्थ्याच्या अंगावर फॅन पडल्याची घटना घडली. यात विद्यार्थी जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी म्हापसा येथील अझिलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या शाळेचे अलिकडेच नूतनीकरण करण्यात आले होते.
वेर्णा येथे झालेल्या कदंब बसच्या अपघातात २३ वर्षीय तरुणी ठार झाली आहे. तर, कुडचडे येथील एकजण जखमी झाला आहे. पणजी ते मडगाव जाणाऱ्या बसने दुचाकीला मागून धडक दिली. यात दुचाकीवरील दोघेही रस्तावर पडले, यात दोघांना गंभीर जखम झाली. जखमी तरुणीचा मृत्यू झाला असून, दुसऱ्यावर उपचार सुरु आहेत. पोलिसांनी याप्रकरणी कदंब चालकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.