Goa News: खाणकाम मोफत मिळालेले नाही... अमित पाटकरांचा पालेकरांना हल्लाबोल; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Today's Live News Update: राज्यातील राजकारण, गुन्हे, पर्यटन, कला - क्रीडा - संस्कृती यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या घडामोडी.
Amit Patkar
Amit PatkarDainik Gomantak
Published on
Updated on

खाणकाम मोफत मिळालेले नाही..., अमित पाटकरांचा पालेकरांना हल्लाबोल

गोव्यातील खाण उद्योगावरुन सध्या राजकीय वातावरण तापले आहे. आम आदमी पक्षाचे (AAP) गोवा संयोजक अमित पालेकर यांनी केलेल्या आरोपांना गोवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. आपल्याला खाणकाम मोफत मिळालेले नाही, उलट आपण कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन सरकारी तिजोरीत 6 कोटी रुपये जमा केले आहेत, असे पाटकर यांनी स्पष्ट केले.

रामा काणकोणकर हल्ला प्रकरणी आरोपी झेनिटोची कोर्टात धाव; जामीन अर्ज केला दाखल

रामा कांकोणकर हल्ला प्रकरणातील आरोपी झेनिटो कार्डोझोने जामीन अर्ज दाखल केला आहे. उत्तर गोवा येथील प्रधान जिल्हा न्यायालयात ८ ऑक्टोबर रोजी अर्जावर सुनावणी होण्याची अपेक्षा आहे.

म्हापसा दरोड्यातील आरोपींनी पळवलेली कार पणजी पुलाखाली बेवारस अवस्थेत आढळली

म्हापसा येथील दरोडा प्रकरणात आरोपींनी वापरलेली आणि पळवलेली पीडित कुटुंबाची कार अखेर पणजी पुलाखाली बेवारस अवस्थेत आढळून आली. पीडितेच्या घरातून रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने लुटल्यानंतर आरोपींनी याच वाहनाचा वापर पळून जाण्यासाठी केला होता.

काँग्रेसच्या नेत्यांनीच केले होते विरियातोंविरोधात काम!

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी विरियातो फर्नांडिस यांच्याविरोधात काम केले. पण आपने मात्र प्रामाणिकपणे काम केले. त्याची काँग्रेसला जाणीव नाही. भाजप सरकारविरोधात आंदोलने छेडण्यात आपच आघाडीवर : अमित पालेकर, राज्य संयोजक, आप

2047 च्या पाण्याची गरज डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करणार; मंत्री शिरोडकर

गोव्याला 2047 साली असलेली पाण्याची आवश्यकता येत्या डिसेंबर 2026 पर्यंतच पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी राज्याचे जलस्रोत खाते वेगवानपणे कार्य करीत आहे. सुभाष शिरोडकर.

काँग्रेसच्या मदतीनेच भाजप गोव्यात सत्तेत; आप

आपने काँग्रेससोबत युती करू नये, अशी लोकांची इच्छा होती. काँग्रेसच्या साथीनेच भाजप वारंवार राज्याच्या सत्तेत. केवळ गोव्यातच नाही देशभर काँग्रेस भाजपला मदत करत आहे : वाल्मिकी नाईक, प्रवक्ते, आप

गोवा भाजी व फूल उत्पादनात 50 टक्के स्वयंपूर्ण

गोवा भाजी व फूल उत्पादनात 50 टक्के स्वयंपूर्ण झाला आहे. गोव्यात पडीक असलेल्या जमिनीवर निदान गुरांचा चारा तरी लावा. त्याच्या आयातीवर सरकार कोट्यवधी रुपये खर्च करते. आमची आजची पिढी शेतात उतरली नाही तर पुढील पिढी शेतात उतरणार नाही. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत.

Formula – 4 मुरगावमध्ये होणार; मंत्री दिगंबर कामत यांच्याकडून शिक्कामोर्तब

मुरगावमध्ये फॉर्म्युला – ४ इव्हेंट होणार असल्याची माहिती सार्वजिनक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी दिली आहे. सरकारने इव्हेंट आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून, तयारी यापूर्वीच सुरु झाल्याची माहितीही त्यांनी दिली.

मोपा विमानतळावर सॅटेलाईट डिव्हाईस बाळगणाऱ्या रशियन नागरिकाविरोधात एका दिवसात गुन्हा आणि आरोपपत्र दाखल

उत्तर गोव्यातील मोपा विमानतळावर इरिडियम सॅटेलाईट डिव्हाईस बाळगणाऱ्या रशियन नागरिकाविरोधात एका दिवसात गुन्हा आणि आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. मोपावरुन दोहा येथे प्रवासासाठी विमानतळावर आले असता प्रवाशाच्या बॅगेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com