
फोंड्यातील व्यवसायिक संदीप चौधरी अपहरण प्रकरणाच्या मुख्य संशयिताच्या मुसक्या आवळण्यात फोंडा पोलिसांना यश. संशयिताला घेऊन पोलिस फोंड्यात दाखल.
टॅक्सी चालकांशी बैठक घेतल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, "लोकांनी गोंधळून जाऊ नये. ओला-उबर गोव्यात येणार नाही. आम्ही सर्वांना विचारात घेऊन समस्या सोडवू."
नव्याने बांधलेल्या आणि अजून उद्घाटन न झालेल्या साकोर्डा पंचायतीच्या छताचा भाग कोसळला. सुदैवाने तिथे कोणीच नसल्याने दुर्घटना टळली. घडलेल्या प्रकारावरुन लोकांमध्ये उलट सुलट चर्चा.
कारवार अंकोला महामार्गावर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सुरुंग येथे दरड कोसळल्यामुळे महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
जीपीएससीच्या वतीने २४ जागांवर भरतीसाठी जाहीरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सहाय्यक कृषी अधिकागोमंतकीयांना सरकारी नोकरीची संधी, GPSC च्या वतीने २४ जागांवर भरती अर्ज करता येणार आहे.
गोव्यातील ७० टक्के अपघात रेन्टेड वाहनांच्या बेशिस्तपणामुळे होतात असे राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले आहेत. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक नियमांचे कठोर पालन आवश्यक असल्याचे सावंत म्हणाले. नागरिकांनी देखील यात सहकार्य करावे, असे आवाहन सावंत यांनी केले आहे.
सिद्धेश्वरनगर- उसगाव येथे कविता हिरेमठ यांच्या घराच्या मागची संरक्षण भिंत घरावर कोसळली. तर मनोहर दोत्रे यांच्या घराच्या समोरील भाग दुसऱ्या घरावर कोसळला. मुसळधार पावसात मोठे नुकसान.
टाकीवाडा- उसगाव येथे प्रदीप पाल यांच्या घराच्या मागच्या बाजूला असलेली दरड कोसळली. सुदैवाने घरातील सर्वजण सुखरूप. मात्र, परिसरात अजून दरड कोसळण्याचा धोका कायम.
गोवा हवामान खात्याच्या वेधशाळेने राज्यात पाच दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या काळात राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.