
बनावट पोलिस तक्रार आणि पैसे उकळण्याच्या सायबर गुन्ह्याप्रकरणी गोवा पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. पुढील तपास सुरु असल्याचे यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले.
गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ 1 मार्च 2025 ते 21 मार्च 2025 दरम्यान राज्यातील 32 परीक्षा केंद्रांवर एसएससी (दहावी) परीक्षा घेणार आहे. 18,871 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
73व्या मलिक अखिल भारतीय पोलिस फुटबॉल स्पर्धेत गोव्याच्या पोलिस संघाने कर्नाटकवर 4-0 असा दणदणीत विजय मिळवला. गोवा पोलिस संघाकडून अब्दुल खान, दीपक नाईक, कुणाल साळगावकर आणि किशन कवळेकर यांनी प्रत्येकी एक गोल केला. स्पर्धेतील मागील सामन्यात गोव्याने बीएसएफ संघाला 1-1 असे बरोबरीत रोखले होते.
काशीनाथ शेट्ये हे अधिकारी नसून सरकारविरुद्ध काम करणारे कार्यकर्ते आहेत. मी त्यांना आव्हान देतो की, त्यांनी माझ्यावर एफआयआर दाखल करावा पण निष्पाप रहिवाशांवर नाही. मी त्यांना 50 वर्षांहून अधिक काळापासून चालत आलेले पारंपारिक मार्ग कधीही बंद करु देणार नाही. आमदार संकल्प आमोणकरांचा घणाघात.
मडगावातील आके आल्त परिसरात घरफोडी. सुवर्णलंकारांसह 1.90 लाखांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला. तक्रारीनंतर मडगाव पोलिसांकडून तपास सुरु.
MPA गेट येथे उभारण्यात आलेला रॅम्प हटवला नाही तर गेट उखडून टाकू असा इशारा स्थानिकांनी दिला आहे. स्थानिक नगरसेवक दीपक नाईक यांनी याप्रकरणी उपजिल्हाधिकारी यांना बायणा रॅम्प हटवण्याबाबत निवेदन दिले आहे.
सध्या राज्यात सुरु असलेल्या केबल विरोधातील मोहिमेवरुन मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर आणि अभियंता काशिनाथ शेट्ये यांच्यात बाचाबाची झाली. दोघांमधील वादाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
कांपाल, पणजी येथे कार आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला आहे. रेंट वर घेतलेल्या खासगी कारने दुचाकीला जोराची धडक दिली. यात दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे. पर्यटकांनी वास्को रेल्वे स्थानकावरुन कार भाड्यावर घेतली होती.
मांडवी नदीत तरंगता मृतदेह आढळला आहे. मृतदेह अज्ञात व्यक्तीचा असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. अधिक तपास सुरु आहे.
तिळारी कालव्याच्या बाजूने महाराष्ट्रातून चोरमार्गाने वाहतूक. दोडामार्ग येथील चेक पोस्ट चुकवून रात्रंदिवस बेकायदेशीरपणे वाहतूक सुरु असल्याचे उघड.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.