Ghaziabad To Goa Flight: आता दिल्लीला जायची गरज नाही; 01 मार्चपासून हिंडन ते गोवा सुरु होणार थेट विमानसेवा

Direct Flights To Goa: एअर इंडिया एक्स्प्रेसला बंगळुरू, गोवा आणि कोलकाता येथे उड्डाण करण्याची परवानगी मिळाली आहे.
Hindon Airport To Goa Direct Flight
Ghaziabad To Goa FlightDainik Gomantak
Published on
Updated on

Hindon Airport To Goa Direct Flight

हिंडन विमानतळावरुन गोवा, बंगळुरू आणि कोलकातासाठी थेट विमानसेवा सुरु होणार आहे. शनिवारपासून (०१ मार्च) ही विमानसेवा सुरु होणार आहे. यासाठीची बहुतांश तयारी विमानतळ प्राधिकरणाने पूर्ण केली आहे. शुक्रवारी दुपारी 12 ते 1 या वेळेत एअर इंडिया एक्स्प्रेसची टीम पाहणी करून व्यवस्था पाहणार आहे.

काही उणिवा असतील तर त्या भरून काढल्या जातील. पहिल्या दिवशी खासदार अतुल गरव यांच्यासह अनेक आमदारही प्रवास करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या वर्षी गोवा आणि बंगळुरूसह चार शहरांसाठी विमानसेवा सुरू करण्याची घोषणा करण्यात आली होती.

एअर इंडिया एक्स्प्रेसला बंगळुरू, गोवा आणि कोलकाता येथे उड्डाण करण्याची परवानगी मिळाली आहे, अशी माहिती हिंडन विमानतळ प्राधिकरणाचे संचालक उमेश यादव यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. शनिवारपासून या तीन शहरांसाठी विमानसेवा सुरू होणार आहे.

Hindon Airport To Goa Direct Flight
E-Passport: आंतरराष्ट्रीय प्रवास व व्हिसा प्रक्रिया झाली सुलभ; गोव्यात ‘ई-पासपोर्ट’ जारी करण्यास सुरुवात

हिंडन विमानतळ सिव्हिल टर्मिनलवरून तिन्ही शहरांसाठी दैनंदिन उड्डाणे सुरु होणार आहेत. उड्डाण करणारी विमाने दररोज हिंडनला माघारी येणार असल्याने येथील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रवाशांसाठी आसन आणि सुरक्षा व्यवस्थेसह सर्व तयारी करण्यात आली आहे. तीन शहरांसाठी सुमारे 120 ते 150 तिकिटांचे बुकिंग झाल्याचे संचालकांनी सांगितले.

खासदार, आमदार आणि व्यापारी नेते गोव्याला जाणाऱ्या विमानाने प्रवास करणार

खासदार अतुल गर्ग, आमदार आणि इतर भाजप नेते, कार्यकर्ते आणि व्यापारी नेतेही गोव्याला जाणाऱ्या पहिल्या फ्लाइटमधून प्रवास करणार आहेत. यासाठी आगाऊ बुकिंग करण्यात आले आहे. या विमानातील जवळपास 80 टक्के जागा बुक झाल्या आहेत.

या विमानसेवेमुळे बंगळुरूला जाणाऱ्या नोकरदारांनाही मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत या लोकांना दिल्लीतून जावे लागत होते.

Hindon Airport To Goa Direct Flight
Konkan Railway: कोकण रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी; मुंबईला जाणाऱ्या ट्रेनच्या नियोजित स्थानकांत बदल

यापूर्वी जोडण्यात आलेली शहरे

आत्तापर्यंत, हिंडन विमानतळ सिव्हिल टर्मिनलवरून आदमपूर, किशनगड, नांदेड, लुधियाना, भटिंडा या ठिकाणांना जोडणारी विमानसेवा सुरु आहे. गाझियाबादचा इतर शहरांशी संपर्क वाढवण्याची प्रक्रिया बराच काळ सुरू होती. गोवा, बंगळुरू आणि कोलकाता येथे विमानसेवा सुरू झाल्याने लोकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com