Goa News: "मी गेल्या 15 वर्षांपासून गोव्यात येत आहे"

Goa Today's 04 October 2025 Live Updates: गोव्यातील गुन्हे, राजकारण, पर्यटन, क्रीडा - कला - संस्कृती यासह विविध क्षेत्रातील ताज्या बातम्या.
Goa Marathi Breaking News
Goa Marathi Breaking NewsDainik Gomantak

अमित शहा आज गोव्यात, विविध विकासकामांचे करणार उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज गोव्यात असून, त्यांच्या हस्ते राज्यातील विविध विकास कामांचे उद्धाटन आणि पायाभरणी होणार आहे. गृहमंत्री शहांच्या हस्ते माझे घर योजनेचा शुभारंभ होणार आहे.

सुर्ल फेरीबोट कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

सुर्ल फेरीबोटीत ड्युटीवरील कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला. पोडोसे जंगलातून संशयीत रुपेश नाईक जेरबंद. साथीदार अनिकेत न्हावेलकरलाही अटक. डिचोली पोलिसांची शुक्रवारी रात्री कारवाई.

ओपा प्रकल्पातील पंप अखेर सुरु, राजधानीला मिळणार पाणी

ओपा प्रकल्पातील पंप अखेर सुरु झाला असून, राजधानी पणजीत काही वेळात पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे.

सुर्ल फेरीबोट कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; रुपेश नाईक आणि अनिकेत नावेळकरला अटक

सुर्ल फेरीबोटीत ड्युटीवरील कर्मचाऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी पोडोसे जंगलातून संशयीत रुपेश नाईक आणि साथीदार अनिकेत न्हावेलकर यांना अटक करण्यात आली आहे. डिचोली पोलिसांची शुक्रवारी रात्री कारवाई.

गोव्याचे डॉ. आकाश रिंगणे यांनी युरोपियन न्यूक्लियर मेडिसिन फेलोशिपसह इतिहास रचला

डॉ. आकाश अनिल रिंगणे हे २०२५ मध्ये बार्सिलोना, स्पेन येथे झालेल्या युरोपियन बोर्ड ऑफ न्यूक्लियर मेडिसिनच्या प्रतिष्ठित फेलोशिपमध्ये उत्तीर्ण होणारे पहिले गोवेकर ठरले.

जुने गोवेत रॅम्प दुरुस्तीमुळे ६ पासून फेरीसेवा राहणार बंद

जुने गोवे येथील फेरी रॅम्पच्या दुरुस्तीचे काम नदी परिवहन खात्याने हाती घेतले आहे. रॅम्प दुरुस्तीच्या कामामुळे ६ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर २०२५ पर्यंत जुने गोवे-दिवाडी मार्गावरील फेरी सेवा बंद ठेवली जाणार असल्याचे नदी परिवहन विभागाने केली आहे. या स्थगितीच्या काळात जनतेने प्रवासाचे नियोजन करावे, असे खात्याने सूचित केले आहे. मात्र, सेंट पेद्रो-दिवार मार्गावर चार फेरी बोटी नियमित वेळापत्रकानुसार चालतील, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

मयेवासियांना पारतंत्र्यातून मुक्त करणार

मयेवासियांना पारतंत्र्यातून मुक्त करणार. आम आदमीचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांची ग्वाही. भाजप-काँग्रेस मिलीभगत. केजरीवालांचा आरोप.

अमित शाह गोव्यात; छायाचित्रण, व्हिडिओग्राफीला मनाई

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या गोवा भेटीमुळे उत्तर गोवा येथील जिल्हा प्रशासनाने झुआरी ब्रिज ते डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम, बांबोळी आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम, बांबोळी या मार्गाभोवती ०२ किमी त्रिज्येपर्यंत कोणत्याही प्रकारच्या मानवरहित हवाई वाहनांचे हवाई छायाचित्रण, व्हिडिओग्राफी आणि उड्डाण करण्यास मनाई केली आहे.

अमित शाह गोव्यात; ड्रोनवर बंदी

अमित शहांच्या भेटीपूर्वी बांबोळीममध्ये ड्रोनवर बंदी

"भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही विशेष फॉर्म्युला बनवण्यास सुरुवात"

गोव्यात कोणताही राजकीय पक्ष विधानसभेच्या सर्व ४० जागा लढवू शकत नाही. भाजपने काँग्रेसमधून काही जागा आयात केल्या आहेत. येत्या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही विशेष फॉर्म्युला बनवण्यास सुरुवात केली आहे - विजय सरदेसाई

डिचोलीतील कृष्णनगर भागात बिबट्याची दहशत

डिचोलीतील कृष्णनगर भागात बिबट्याची दहशत. कुत्र्यांचा फडशा. स्थानिक भयभीत. बिबट्याला पकडण्यासाठी वन खात्याने लावलाय पिंजरा.

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाहा गोव्यात

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाहा यांचे गोव्यातील आयएनएस हंसा येथे 'म्हजे घर' योजना आणि २,४५१ कोटी रुपयांच्या प्रमुख विकास प्रकल्पांच्या शुभारंभासाठी मंत्री माविन गुदिनो यांनी स्वागत केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात गृहनिर्माण, विकास आणि कल्याणकारी उपक्रमांना महत्त्वपूर्ण चालना मिळावी यासाठी त्यांच्या भेटीतून हे स्पष्ट होते.

"सहा महिन्यांत प्रत्येक गोमंतकीयाच्या घराची नोंदणी होईल!" - मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यावेळी योजनेच्या अंमलबजावणीबद्दल विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले, "म्हाजे घर योजने अंतर्गत सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे आणि मला खात्री आहे की सहा महिन्यांच्या आत प्रत्येक गोमंतकीय कुटुंबाच्या घराची नोंदणी त्यांच्या नावावर होईल."

"मी गेल्या 15 वर्षांपासून गोव्यात येत आहे"

"मी गेल्या १५ वर्षांपासून गोव्यात येत आहे आणि दिवसेंदिवस ते विकसित होत असल्याचे मला दिसत आहे. विकसित गोवा पाहण्यासाठी आपल्याला २०४७ पर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. २०३६-३७ पर्यंत गोवा विकसित होईल." :- अमित शाह

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com