Goa News: धक्कादायक! दारूच्या नशेत घरी परतला, दारातच कोसळला; रुग्णालयात नेईपर्यंत...

Death Case Goa: भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या आशिष तोपो या तरुणाचा खोलीतच पडून मृत्यू झाला
Jharkhand man drunken death goa
Goa Death Dainik Gomantak
Published on
Updated on

Savardem Latest News In Marathi

सावर्डे: दारूच्या नशेत अनेकवेळा अशा काही घटना घडतात ज्या थेट जीवावर बेतू शकतात. गोव्यात देखील काहीसा असाच प्रसंग घडला, धडे-सावर्डे येथे भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या आशिष तोपो (३३, मूळ झारखंड) या तरुणाचा खोलीतच पडून मृत्यू झाला. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपासाला सुरुवात केली.

कुडचडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष तोपो याला दारूचे व्यसन होते. तो नेहमीच दारूच्या नशेत असायचा. चौकशीच्या वेळी मिळालेल्या माहितीनुसार आशिष तोपो मद्यधुंद अवस्थेत खोलीत आला आणि आत प्रवेश करताना कोसळून खाली पडल्याने त्याला त्वरित काकोडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले गेले, मात्र इथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Jharkhand man drunken death goa
Goa Crime: विश्वास संपादन करून असहाय्य महिलेला 9 लाखांचा गंडा! वृद्धाश्रम सदस्याची करामत; दागिनेही केले लंपास

कुडचडे पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दक्षिण गोवा जिल्हा हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com