Chhattisgarh Crime: भक्ती की अंधश्रद्धा? अकरावीत शिकणाऱ्या मुलीने जीभ कापून महादेवाला केली अर्पण

Chhattisgarh Crime News: छत्तीसगढमधील सक्ती जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे 11 वी शिकत असणाऱ्या तरुणीने अंधश्रद्धेच्या नावाखाली स्वत:ची जीभ कापली.
Chhattisgarh Crime: 11वीत शिकणाऱ्या तरुणीने भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी कापली जीभ; स्वतःला घेतले मंदिरात कोंडून
Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

छत्तीसगढमधील सक्ती जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे 11 वी शिकत असणाऱ्या तरुणीने अंधश्रद्धेच्या नावाखाली स्वत:ची जीभ कापली. सक्ती जिल्ह्यातील देवरघाटा गावातील आचारीपाली येथील 16 वर्षीय तरुणीने आपली जीभ कापून ती भोले बाबाला अर्पण केली. एवढ्यावरच न थांबता तिने स्वत:ला मंदिरात कोंडून घेतले आणि ध्यानाला बसली.

दरम्यान, पोलिसांना (Police) जशी या घटनेची माहिती मिळाली तशी त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र गावातील लोकांनी पोलिसांना घेराव घालत मंदिरात जाऊ दिले नाही. हे प्रकरण दाभ्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडले. सोमवारी सकाळी 7 वाजता तरुणीने तिची जीभ कापून ती घराजवळील तलावाच्या काठावरील भोले बाबाच्या मंदिरात अर्पण केली. तरुणीने एक चिठ्ठीही लिहिली.

Chhattisgarh Crime: 11वीत शिकणाऱ्या तरुणीने भगवान शिवाला अर्पण करण्यासाठी कापली जीभ; स्वतःला घेतले मंदिरात कोंडून
Chhattisgarh HC: मृतदेहासोबत शारीरिक संबंध लैंगिक अत्याचार होत नाही; छत्तीसगड हायकोर्ट

दुसरीकडे, तरुणीच्या पालकांना पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी समजावून तिला रुग्णालयात (Hospital) दाखल करण्याची विनंती केली, मात्र पालकांनी स्पष्ट नकार दिला. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी, रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचे पथक उपस्थित आहे. तरुणीने असे पाऊल का उचलले याची चौकशी पोलिस स्थानिकांकडे करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Sikh Couple Killed In Pakistan Gurdwara Mardan
woman assaulted in front of children
ED Attaches Hotel Westin Goa
Man Cuts Private Part Temple
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com